Why did MGP leave Goa and hold its Central Committee meeting in Belgaum  dainik gomantak
गोवा निवडणूक

पळवले जाण्याच्या भीतीपोटी ‘मगो’चे उमेदवार बेळगावात

गोव्यात पक्षांतराचा सिलसिलाही सुरूच

दैनिक गोमन्तक

पणजी: सध्या राज्यात (Goa) उमेदवारफुटीचे पेव फुटले आहे. पक्षांतराचा सिलसिलाही सुरू आहे. या भीतीपोटी मगोपने (MGP) काल बेळगावात केंद्रीय समितीची तातडीची बैठक घेतली. ही बैठक गोवा सोडून बेळगावात (belgaum) का आयोजित केली, अशी चर्चा राज्यात रंगली.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षातील काही संभाव्य उमेदवारांच्या पक्षांतराबाबतच्या अफवा सुरू आहेत. त्यापैकी काही खऱ्याही ठरत आहेत. मगोने निश्‍चित केलेल्या 12 उमेदवारांमधील काहीजणांना इतर राजकीय पक्षांनी गळ घालण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे या उमेदवारांची पळवापळवी होऊ नये म्हणून मगो पक्षाची केंद्रीय समिती तसेच 12 उमेदवार बेळगावला जाऊन तेथे बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतरचे छायाचित्रही या पक्षाने मगोच्या व्हॉटस ॲपवर टाकले आहे.

आमदार सुदिन ढवळीकर यांनी वेळोवेळी भाजपशी कोणत्याही परिस्थिती युती केली जाणार नाही, असे ठणकावून सांगितले आहे. भाजपने मगोला तीनवेळा फसविले आहे. आता पुन्हा युती करणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखे होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. १२ ते १६ जागांवर मगो निवडणूक लढवील. उर्वरित मतदारसंघांत भाजपविरोधी समविचारी राजकीय पक्षांना मगो पाठिंबा देईल, असे स्पष्ट केले होते. सध्याची मगोची भूमिका पाहता ते कोणत्याही स्थितीत युती करण्याच्या शर्यतीत नाही. त्यांचे 12उमेदवार ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत, त्यात समझोता न करण्याबाबत ठाम आहेत.

बैठकीत कोण?

या बैठकीला केंद्रीय समितीचे पदाधिकारी यांच्यासह निश्‍चित केलेले संभाव्य 12 उमेदवार होते. त्यामध्ये आमदार सुदिन ढवळीकर, पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर, प्रताप फडते, अनंत नाईक, जीत आरोलकर, प्रवीण आर्लेकर, नरेश सावळ, महेश साटेलकर, प्रेमेंद्र शेट, केतन भाटीकर, संकेत मुळे, विनायक गावस आणि आनंद प्रभुदेसाई यांचा समावेश आहे.

उमेदवार फुटणार नाहीत : दीपक ढवळीकर

मगो पक्षाशी युती करण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी प्रयत्न चालविले होते. या युतीची बोलणीही सुरू असल्याची ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली होती. मात्र, मतदारसंघ वाटपावरून ही बोलणी पुढे सरकलीच नाही. मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनीही युती करणार नाही, असा दावा केला होता. त्यांचे सर्व उमेदवार एकसंध असून त्यांच्यात कोणतीच फूट नसल्याचे दाखवून दिले आहे. पक्षाचे 12 उमेदवार यापूर्वीच निश्‍चित झाले असून त्यातील कोणीही फुटणार नाही, असा दावा मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT