Sonia Gandhi, Rahul Gandhi and TMC chief Mamata Banerjee
Sonia Gandhi, Rahul Gandhi and TMC chief Mamata Banerjee Dainik Gomantak
गोवा निवडणूक

काँग्रेस गोव्यात TMCसोबत युती करण्यात का रस दाखवत नाही?

दैनिक गोमन्तक

गोव्यात पुढील महिन्यात होणाऱ्या (Goa Assembly Election 2022) विधानसभा निवडणुका लक्षात घेता, तृणमूल काँग्रेसने (Trinamool Congress) काँग्रेस (Congress)पक्षासोबत युती करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, याबाबत काँग्रेसकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. टीएमसीच्या नुकत्याच झालेल्या काँग्रेसविरोधी वक्तव्यांमुळे काँग्रेस पक्ष चांगलाच नाराज असल्याचे मानले जात आहे. कारण या विधानांमुळे इतर पक्षांना काँग्रेसविरोधात आवाज उठवण्याची पूर्ण संधी मिळाली. दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये युतीबाबत चर्चा झाली. कारण 14 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकांसाठी तृणमूलला काँग्रेससोबत (Congress) जागावाटपाची इच्छा होती.

तृणमूल काँग्रेस (TMC) च्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, “आम्ही गोव्यात काँग्रेसला 16-18 जागा देण्यासही तयार आहोत. आमचा निवडणूक मित्र पक्ष महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (Maharashtrawadi Gomantak Party) 9 जागांसाठी उमेदवार जाहीर केले होते. एमजीपीच्या एका जागेवर काँग्रेस मजबूत स्थितीत असल्याचे सांगितले. ती जागा काँग्रेसला देण्याबाबत आम्ही एमजीपीशी बोलू, असे आश्वासनही आम्ही त्यांना दिले होते. या चर्चेत संभाव्य जागा वाटप कराराचाही समावेश होता. ज्यामध्ये भाजपशी सामना करण्यासाठी टीएमसी काँग्रेसला बहुमत देण्यास तयार होती.

काँग्रेसने टीएमसीसोबत युती न करण्याचे कारण स्पष्ट केले

टीएमसी नेत्याने सांगितले की, "आम्ही सुरुवातीला सांगितले की गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि टीएमसी दोन्ही समान पातळीवर आहेत आणि दोन्ही पक्ष समान संख्येने जागा लढवू शकतात. गोव्यात काँग्रेसला दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी आम्ही जास्त जागा द्यायला तयार आहोत. मात्र, काँग्रेसच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी गोव्यात टीएमसीसोबत युती का करायची नाही याची अनेक कारणे देत युती करण्यात रस दाखवला नाही."

'टीएमसीकडे आम्हाला देण्यासारखे काही खास नाही'

काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, "आम्ही गोव्यातील प्रमुख विरोधी पक्ष आहोत. TMC कडे आम्हाला ऑफर करण्यासाठी काही खास नाही. गोव्यात आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसचे समीकरण काय असेल याबद्दलही आम्हाला खात्री नाही. अलिकडच्या दिवसांत टीएमसीने काँग्रेसवर केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे पक्षाचे शीर्ष नेते देखील टीएमसीच्या नेतृत्वावर नाराज आहेत."

पक्षाध्यक्षा सोनिया गांधी टीएमसीने केलेल्या काँग्रेसविरोधी वक्तव्यामुळे प्रचंड नाराज असल्याचा दावा काँग्रेसच्या एका वरिष्ठ रणनीतीकाराने केला. गोव्यात तृणमूलचे अस्तित्व आमच्या पक्षाच्या आमदारांवर अवलंबून आहे, त्यामुळे येणारा काळच गोवा निवडणूकीचे खरे चित्र पुढे आणणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

Goa Crime News: भागीदारीसाठी गुंतवलेल्या पैशांमध्ये केली अफरातफर; कळंगुट पोलिसांनी सहाजणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

SCROLL FOR NEXT