Goa Health Minister Vishwajeet Rane Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोव्यात विश्वजीत राणेंना मिळणार दुसऱ्या क्रमांकाची जबाबदारी?

शनिवारी रात्री उशिरा काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि विश्वजीत राणे यांना गृहमंत्री अमित शहा पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्लीला बोलावून सविस्तर चर्चा केली.

दैनिक गोमन्तक

गोवा: गोव्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आज दहा दिवस उलटून गेले; भाजप सर्वाधिक जागा जिंकून आलेला पक्ष असला तरीही भाजपने अजूनही सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. तसेच विधिमंडळातील नेत्यांची निवड देखील अद्याप करण्यात आलेली नाही राज्यात गोव्याची विधानसभा निवडणूक ही संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरली होती.(Vishwajeet Rane is likely to get second position in the goa Assembly)

भाजपला एक हाती सत्ता मिळाल्यानंतर गोव्याच्या (Goa) चर्चांना पूर्णविराम मिळेल अशी अपेक्षा होती मात्र मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच विश्वजित राणे (Vishwajeet Rane) यांच्यातील मुख्यमंत्रीपदाच्या वादाच्या चर्चा सध्या देशभर गाजू लागल्या आहेत.

मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेसाठी प्रमोद सावंत (Pramod Sawant) आत्तापर्यंत तब्बल दोन वेळा दिल्लीला जाऊन आलेले आहेत यातच शनिवारी रात्री उशिरा काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि विश्वजीत राणे यांना गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्लीला बोलावून सविस्तर चर्चा केली. त्यानंतर सावंत हे रविवारी पहाटे गोव्यात परतले. समोर आलेल्या चर्चेमधुन मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी ही पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांच्या खांद्यावर राहणार असल्याचे समोर आले आहे.

तसेच विश्वजित राणे यांना मंत्रिमंडळातील महत्त्वाचे आणि दुसऱ्या क्रमांकाचे स्थान देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मागील तीन दिवसांपासून विश्‍वजित राणे हे दिल्लीतच तळ ठोकून आहेत.

गोवा विधानसभेत कुणाला किती जागा मिळाल्या...?

भाजप : 20

काँग्रेस : 11

आप : 2

मगो : 2

आरजीपी : 1

अपक्ष : 3

गोवा फॉरवर्ड पार्टी : 1

तृणमूल काँग्रेस : 0

राष्ट्रवादी : 0

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

SCROLL FOR NEXT