Vinod Palyekar Dainik Gomantak
गोवा निवडणूक

शिवोलीत माझ्या कारकिर्दीत सर्वाधिक विकास झाला: विनोद पालयेकर

विनोद पालयेकर: गोवा फॉरवर्डचा उमेदवार म्हणून लोकांसमोर गेलो असतो, तर लोकांकडून हेळसांड झाली असती.

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा

शिवोली: शिवोलीच्या जनतेने आपल्याला 2017 साली निवडून दिल्याने शिवोलीचा विकास करणे माझे कर्तव्य होते. त्यानुसार गेल्या पाच वर्षांच्या काळात मी सर्वाधिक विकास केलेला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवोली अविकसित राहिल्याचा आरोप केला जात आहे. या गोष्टीला आपण नव्हे, तर सत्तास्थानी असलेले सरकारच अधिक जबाबदार असल्याचा आरोप शिवोलीचे अपक्ष उमेदवार विनोद पालयेकर यांनी सांगितले.

प्रचार फेरीची समाप्ती करताना स्थानिक प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. गेली अठरा ते वीस वर्षे अविकसित राहिलेली शिवोली पंचक्रोशी आणि येथील खुंटलेला विकास या गोष्टीला माझा कार्यकाळ कारणीभूत नसून गेली वीस वर्षे शिवोलीत राज्यकारभार हाकणारे प्रस्थापित राजकारणीच असल्याचे त्यांनी सांगितले. शिवोलीत अपक्ष या नात्याने उतरण्याचा माझा निर्णय स्वतःचा आहे. त्यामुळे गोवा फॉरवर्डला दोष देण्याची बिल्कुल गरज नसल्याचे पालयेकर यांनी सांगितले.

गोवा फॉरवर्डचा उमेदवार म्हणून लोकांसमोर गेलो असतो, तर लोकांकडून हेळसांड झाली असती. परंतु आज अपक्ष म्हणून जाताना जोरदार पाठिंबा मिळत असल्याचे पालयेकर यांनी सांगितले. माझ्या मत्रिपदाच्या कार्यकाळात मी सदोदित समाजाचे भले करण्याचा प्रयत्न केला, परंतु दरम्यानच्या काळात उद्भवलेल्या कोविड महामारीने विकासकामांवर मर्यादा आणल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जनतेने पुन्हा संधी दिल्यास शिवोलीचा संपूर्ण विकास साधणार आहे. आपण केलेल्या कामांची हमी देत स्थानिक मतदार आपल्याला भरघोस मतांनी विजयी करणार असल्याचे शेवटी पालयेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT