मोदींचे अच्छे दिन कुठे आहेत म्हणून दिगंम्बर कामत यांनी उपस्थित केला प्रश्न
सासष्टी: 1994 पासून मडगावचे आमदार राहिलेले दिगंबर कामत केवळ खोटारडेपणा करीत असून भाजप सरकारने गत दहा वर्षांत काहीच विकास केला नाही व अच्छे दिन कुठे आहेत अशी टीका ते करीत आहेत. 2007 ते 2012 या कालावधीत कामत मुख्यमंत्री होते. त्यांच्या या कारकिर्दीत गोव्यात व मडगावात कसली विकासकामे झाली ते त्यांनी सांगावे, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिले आहे,
दिगंबर कामत विकासकामे केली असे जे सांगतात, ती सर्व कामे ते भाजप सरकारात होते तेव्हा सुरू झाली होती. 2012 साली स्व. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी अनेक लोककल्याणकारी योजना, उपक्रम सुरू केले. त्याची अंमलबजावणी आजपासून डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार करीत आहे, असेही तानावडे म्हणाले.
दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे निमंत्रक अरविंद केजरीवाल केवळ 'मुंगेरीलालके हसीन सपने’ पाहात आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोटारडे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा आपण निषेध करतो, असे ते म्हणाले.
22 संकल्पांची 100 टक्के कार्यवाही
आगामी निवडणुकीसाठी पक्षातर्फे जे 22 संकल्प लोकांसमोर ठेवले आहेत, त्याची 100 टक्के कार्यवाही भाजप सरकार करेल, असे आश्र्वासन भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.