Utpal Parrikar vs Babush Monserratte in Panaji constituency Dainik Gomantak
गोवा निवडणूक

पणजीत ‘बाबूश’ना ‘उत्पल’देणार का शह ?

दैनिक गोमन्तक

पणजी : पणजी मतदारसंघात सध्या महाभारत सुरु झाले असून एका बाजूला ‘धर्म’ पाळणारे मनोहर पर्रीकरांचे पुत्र उत्पल तर दुसऱ्या बाजूला अनेक पक्षांचे वाऱ्या करून आलेले व सध्या भाजतपर्फे निवडणूक लढविणारे माजी आमदार बाबूश मोन्सेरात यांच्यातला सामना जबदरस्त रंगू लागला आहे. बाबूश हे ‘हेवीवेट’ राजकारणी असल्यामुळे पडद्यामागून कोणती सूत्रे कशी फिरवतील हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे उघड डावपेचाबरोबर छुप्या डावपेचांची स्पर्धाही सुरू झाली आहे. कॉंग्रेसपुढील आव्हान गडद झाले आहे.आता उत्पल पर्रीकर मनोहर भाईंचा वारसा पुढे नेऊन बाबूश त्यांना ‘चेकमेट’ देतात का,याची सर्वांना उत्सुकता आहे. (Utpal Parrikar vs Babush Monserratte in Panaji News Updates)

पणजीत सुरू असलेल्या या हाय होल्टेज लढतीत दिवसागणिक वेगळेच रंग चढताना दिसत आहेत. उत्पलनी जेव्हा भाजप (BJP) त्यागून अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची घोषणा केली तेव्हा भुवया उंचावून बघणारे लोक आज या रोमहर्षक लढतीकडे आ वासून बघताना दिसत आहेत. त्यात परत शिवसेनेने आपला उमेदवार मागे घेऊन तसेच माजी महापौर उदय मडकईकर यांनी पणजीतील कॉंग्रेसच्या उमेदवारा ऐवजी उत्पलना पाठिंबा देऊन या लढतीत अधिकच आग ओतली आहे.

बाबूश (Babush Monseratte) यांचा पणजीतल्या मतदारांशी चांगला संबंध असला तरी इथे पर्रीकर पुत्र उत्पलांवर अन्याय झाल्याची भावना जास्त प्रभावी ठरत आहे. या दोघांच्या लढतीमुळे कॉंग्रेस मागच्या बाकावर बसल्यासारखी वाटायला लागली आहे. पणजीत कॉंग्रेसची मते नाहीत, असे नाही. 2017 साली झालेल्या पोटनिवडणुकीत पर्रीकर विरोधात असूनही कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना पाच हजारांहून अधिक मते मिळाली होती. आणि 2019 च्या पोटनिवडणुकीत तर कॉंग्रेसच्या बाबूश मोन्सेरात यांनी भाजपचे सिध्दार्थ कुंकळ्ळकर यांच्यावर मात केली होती. पण आता परिस्थिती बदलली आहे आणि त्यामुळे बाबूश यांना आपल्या रणनीतीत बदल करावा लागतो आहे.

पणजीत हिंदूबरोबर कॅथलिक मते असून त्यातली काही मते सुध्दा उत्पलच्या (Utpal Parrikar) पारड्यात जाऊ शकतात, असे दिसते आहे. यामुळे कॉंग्रेसच्या एल्विस गोम्स समोरचे आव्हान बरेच गडद झाले आहे. त्यात पुन्हा त्यांचा बाहेरचा उमेदवार असा प्रचार होत असल्यामुळे त्यांच्या मतांवर परिणाम होऊ शकतो. आम आदमी पक्षातर्फे रिंगणात असलेले वाल्मिकी नाईक हे तसे पणजीकरांचे ओळखीचे उमेदवार. 2017 व नंतर 2019 ची पोटनिवडणूक त्यांनी लढविल्यामुळे ते मतदारांशी चांगलेच परिचित आहेत. 2017 साली तर त्यांना 2000 हून अधिक मते प्राप्त झाली होती. मात्र पुढच्या निवडणुकीत ही मते पाचशे पर्यंत घसरली होती. तरीसुध्दा ते आपतर्फे कार्यरत असल्यामुळे एक प्रभावी उमेदवार ठरू शकतात. यामुळे ते उत्पल बाबूश यांच्या लढतीचा तिसरा कोन बनण्याची शक्यता अधिक वाटते.

रिव्होल्युशनरी गोवन्स तर्फे राजेश रेडकर हे रिंगणात असून देवेंद्र सुंदरम व यशवंत मदार यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. असे असले तरी सगळा ‘फोकस’ आहे तो बाबूश व उत्पलांच्या संघर्षावर. या लढतीवर सध्या सगळ्या देशाचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

पणजी मतदारसंघाचा निकाल केवळ गोव्याकरिता नव्हेच तर पुऱ्या देशाकरिता‘टर्निंग पॉईंट’ ठरू शकतो असे संकेत मिळत आहेत.

‘पुराने खिलाडी’ तरीही डेंजर झोनची भीती

सध्या पणजीत उत्पलना मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहून बाबूश ‘डेंजर झोन’ मध्ये तर पोहचणार नाही, ना असे वाटायला लागले आहे. बाबूश हे ही एक ‘पुराने खिलाडी’ असल्यामुळे त्यांनाही समीकरणे कशी बदलायची, हे चांगलेच ठाऊक आहे. असे असूनसुध्दा ही निवडणूक बाबूशना सोपी जाणार नाही, असेच वाटू लागले आहे.

बाप से बेटा ठरणार का सवाई ?

खरेतर ही लढत बाबूश व उत्पलमध्ये नसून बाबूश व दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्यात आहे असे बोलले जाते. मनोहर पर्रीकर हयात असताना त्यांनी बाबुशशी कधीच ‘पंगा’ घेतला नव्हता. पणजीत त्यांनी बऱ्याचवेळा बाबुश यांच्याशी ‘सेंटिग’ केल्याचे बोलले जात होते.पण आता त्यांच्या मृत्यूनंतर उत्पलनी बाबुशना आव्हान देण्यास सुरुवात केल्यामुळे ‘बाप से बेटा सवाई’ असे लोक बोलताना दिसत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT