Goa Politics: गोव्यात बेटा काँग्रेससाठी, तर बाप तृणमूलसाठी?

ब्रागांझा घराण्यातील बाप आणि बेटा चांगलेच चर्चेत
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: म्हापशाचे माजी नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनी भाजपचा राजीनामा न देता काँग्रेसच्या व्यासपीठावर येऊन स्थानिक भाजप आमदार ज्योशुआ डिसोझा यांच्या निष्क्रितयेबाबत टीका करून काँग्रेसचे (Goa Congress) उमेदवार सुधीर कांदोळकर यांना अलीकडेच उघडरीत्या पाठिंबा दिला होता. त्या घटनेला आठ दिवसही पूर्ण झाले नाहीत. (Political storm in the state on the backdrop of Goa Assembly elections)

Goa Politics
गोवा विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर

रायनचे पिता असलेले माजी नगराध्यक्ष आर्मिन ब्रागांझा यांनी आता तृणमूल काँग्रेसचे उमेदवार तारक आरोलकर यांना आशीर्वाद देऊन सुयश चिंतिले असल्याचे वृत्त छायाचित्रांसह तृणमूल काँग्रेसमार्फत (Goa TMC) सर्वत्र प्रसारित केले जात आहे. त्या वृत्ताचा आर्मिन ब्रागांझा यांनी आजपावेतो इन्कार न केल्याने म्हापशाच्या राजकारणात दीर्घकालीन योनदान दिलेल्या या ब्रागांझा घराण्यातील बेटा काँग्रेससाठी, तर बाप तृणमूलसाठी कार्यरत असल्याची चर्चा मात्र सर्वदूर पोहोचली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Cyber Crime
Goa IIT
Goa Social Media Ban
CM Pramod Sawant Inquiry Order
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com