Utpal Parrikar loses in Panjim | Utpal Parrikar News | Goa election result 2022 News Dainik Gomantak
गोवा निवडणूक

उत्पल पर्रीकर हरले, तरी मने जिंकली!

लढतीबद्दल समाधानी, परंतु निकाल थोडासा निराशाजनक, उत्पल यांची प्रतिक्रिया

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष म्‍हणून निवडणूक लढवलेल्‍या पणजी मतदारसंघाकडेही तमाम देशवासियांचे लक्ष लागून राहिले होते. भाजपने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्यापुढे आव्हान होते ते बलाढ्य बाबूश मोन्सेरात यांचे. पणजी मतदारसंघ हा बाबूश यांचा बालेकिल्ला मानला जातो. बाबूश यांना पराभूत करण्यासाठी उत्पल यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांनी बाबूश यांना जबरदस्त टक्कर दिली. बाबूश यांना 6787 तर उत्पल यांना 6071 मते मिळाली. उत्पल यांचा 716 मतांनी पराभव झाला. उत्पल यांचा पराभव जरी झाला असला तरी त्यांनी पणजीकरांची मने मात्र जिंकली. (Utpal Parrikar News)

अपक्ष उमेदवार म्हणून ही एक चांगली लढत होती, मी लोकांचे आभार मानतो. लढतीबद्दल समाधानी आहे, परंतु निकाल थोडासा निराशाजनक आहे, अशी प्रतिक्रिया उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना दिली. भाजपने यादी जाहीर केल्यानंतर उत्पल यांनी बंडखोरी केली होती.''या भागातून भाजपने ज्या उमेदवाराला तिकीट दिले आहे ते डिफॉल्टर आहेत. त्यांनी नेहमीच भाजपच्या (BJP) विरोधात काम केले आहे. आमच्या कार्यकर्त्यांनाही त्यांचे काम करायचे नाही. त्यांच्यावर बलात्कार आणि इतर अनेक गुन्हे दाखल आहेत. मी राजीनामा देताना पक्षाला सांगितले होते की, या जागेवर चांगला उमेदवार द्या, मी घरी जाईन’, अशी भूमिका पर्रीकर यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर घेतली होती.

बाबूश मोन्सेरात हे पाच वेळा आमदार म्‍हणून निवडून आले आहेत. त्यांनी युनायटेड गोवन्स डेमोक्रॅटिक पार्टीकडून दोन वेळा आणि काँग्रेसच्या (Congress) तिकीटावर तीन वेळा निवडणूक जिंकली आहे. त्‍यांचा मुलगा रोहित हे पणजीचे महापौर तर पत्नी जेनिफर मोन्‍सेरात या देखील आमदार आणि राज्य सरकारमध्ये महसूलमंत्री आहेत. मोन्सेरात 2002 पासून राजकारणात आहेत. मोन्सेरात हे रिअल इस्टेट आणि हॉस्पिटॅलिटी व्यवसायातही आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीय संस्कृतीने सजला IFFI 2024! आकाशकंदील स्पर्धा, शिगमा-कार्निव्हल परेडला भरघोस प्रतिसाद

महिलेच्या खासगी जागी बोट लावणे लैंगिक अत्याचार होत नाही; गोवास्थित मुंबई हायकोर्टाचा निर्णय, संशयिताला जामीन

Nagarjuna At IFFI: 'त्यांचे उद्दिष्ट होते की तेलुगु चित्रपट सृष्टीला दखल घेण्याजोगी..', नागार्जुनने जागवली वडिलांची हृदयस्पर्शी आठवण

Calangute Baga: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध भाग दाखवला रेड लाईट एरिया; Youtuber ने हात जोडून मागितली माफी

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

SCROLL FOR NEXT