Utpal Parrikar casted Vote for Goa Election Dainik Gomantak
गोवा निवडणूक

वडिलांच्या मार्गावर चाललो आहे, उत्पल पर्रीकरांची भावनिक साद

आदित्य जोशी

पणजी : भाजपशी बंडखोरी केल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनोहर पर्रीकरांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आज निवडणूक लढवत असलो तरी वडील मनोहर पर्रीकर यांची आठवण येते आहे. आपण त्यांच्याच मार्गावर चाललो आहे, असं म्हणत पुन्हा एकदा भावनिक साद घातली आहे. (Utpal Parrikar casted Vote for Goa Election: Goa Election Voting Day Live)

उत्पल पर्रीकरांनी (Utpal Parrikar) पणजीत आपलं मत नोंदवलं. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यानंतर उत्पल पर्रीकरांनी मतदारांची भेट घेत त्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं. आज माझी बोलण्याची वेळ संपलेली आहे, आज पणजीतील जनता बोलणार. त्यामुळे मतदारांनी घराबाहेर पडून आपलं मत नोंदवावं. आपला जनतेवर पूर्ण विश्वास असल्याचंही उत्पल यांनी स्पष्ट केलं.

जेव्हा बदल होतो तेव्हा मोठ्या प्रमाणात मतदान होतं, पणजीत मोठ्या प्रमाणात मतदार बाहेर पडलेत, त्यामुळे बदल नक्की दिसेल असा विश्वासही उत्पल पर्रीकर यांनी व्यक्त केला. बाकीचे उमेदवार विरोधकांचा अपप्रचार (Election Campaign) करतात, मात्र मला तसं करायचं नाही. एक सकारात्मक दृष्टीकोन पणजीबाबत ठेवून निवडणूक लढवत आहे. आपल्याला पणजीतील मतदार साथ देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वडील मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांच्या मार्गावर चालण्याचा प्रामाणिक प्रयत्न असणार. त्यांची आठवण मनात आहे, हे लोकांना सांगितलंय. पणजीतील जनता आपल्या पाठिशी उभी राहिल असा विश्वास उत्पल यांनी व्यक्त केलाय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT