Smriti Irani Dainik Gomantak 
गोवा निवडणूक

काँग्रेसप्रमाणे भ्रष्टाचार नव्हे तर भाजप विकास करणार

स्मृती इराणी : सुभाष शिरोडकर यांच्या प्रचारार्थ शिरोडा येथे सभा

दैनिक गोमन्तक

शिरोडा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  अनेक योजना, विकास प्रकल्प उभे केले आहेत. कल्याणकारी योजनांचे पैसे थेट लोकांच्या खात्यात शंभर टक्के जमा होत आहेत. या  उलट काँग्रेसच्या काळामध्ये फक्त 10 टक्के रक्कम लोकांना मिळत होती. काँग्रेसने आपल्या कार्यकाळात गोव्यासाठी रस्ते बांधण्यासाठी  फक्त  120 कोटी रुपये दिले होते. तर भाजपने गेल्या सात वर्षांमध्ये  4 हजार कोटी रुपये दिले आहेत. हाच या दोन्ही पक्षांमधील फरक आहे. त्यामुळेच गोव्यातील जनता भाजपला मत देऊन बहुमताचे सरकार सत्तेवर आणणार आहे असे मत प्रतिपादन केंद्रीय महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री स्मृती इराणी यांनी आज  शिरोडा येथे व्यक्त केले.

भाजपचे उमेदवार सुभाष शिरोडकर यांच्या प्रचारार्थ बाजार शिरोडा येथे आयोजित जाहीर सभेत स्मृती इराणी बोलत होत्या. यावेळी उमेदवार सुभाष शिरोडकर , माजी खासदार नरेंद्र सावईकर, तसेच शिरोडा मतदार संघाचे भाजपाचे मंडळ पदाधिकारी, जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच ,उपसरपंच व इतर नेते उपस्थित होते. इराणी यांनी सांगितले की गोव्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचे सरकार असल्यामुळेच विविध प्रकल्प राबवले.

काँग्रेसवर विश्‍वास का ठेवावा?

काँग्रेसने आपल्या कार्यकाळात निर्माण केलेला एखादा प्रकल्प दाखवावा, एखादे काम सांगावे , एखादी योजना सांगावी. जर काँग्रेसने काहीच केले नसेल तर काँग्रेसला मतदार मत तरी का देतील? असा प्रश्न इराणी यांनी उपस्थित केला. काँग्रेसचा स्वतःच्या उमेदवारावर जर विश्वास नसेल तर मतदारांनीही त्यांच्या उमेदवारावर का विश्वास ठेवावा? असा टोलाही यावेळी इराणी यांनी लगावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT