Two and a half lakh women registered for Trinamool congress Grihalakshmi card in Goa
Two and a half lakh women registered for Trinamool congress Grihalakshmi card in Goa Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोव्यात तृणमूलच्या गृहलक्ष्मी कार्डसाठी अडीच लाख महिलांची नोंदणी

Priyanka Deshmukh

पुढील महिन्यात पाच राज्यांच्या विधानसभा (Assembly Election) निवडणुका होणार आहे. अनेक पक्षांनी आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत. अशातच गोव्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीकडे सर्वच पक्ष आणि मतदरांचे लक्ष लागले आहे. तृणमूल काँग्रेसनेही गोव्यात हातपाय पसरायला सुरवात केली. ममता दीदींचे (Mamata BAnarjee) अनेक दौरेही गोव्यात झाले आहे. त्याचबरोबर अनेक पक्षाच्या नेत्यांनी तृणमूलमध्ये प्रवेशही केला आहे. ममता बॅनर्जी यांनी गोव्याच्या पहिल्या दौऱ्याच्या वेळी अनेक स्थानिक पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. याचवेळी अनेक आश्वासनही तृणमूलकडून (TMC) गोवेकरांना देण्यात आले आहेत.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर तृणमूल काँग्रेसने गोव्यात आपली गृहलक्ष्मी योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक घरातील महिला प्रमुखाला दरमहा 5,000 रुपये रोख रक्कम दिली जाणार आहे. त्यांचे उत्पन्न कितीही असले तरी गोव्यातील महिला या येजनेचा लाभ घेवू शकणार आहे. ही योजना कोणत्याही विशिष्ट जाती किंवा समुदायाशी संबंधित नाही, तुम्ही कोणत्याही विशिष्ट आर्थिकदृष्ट्या वंचित वर्गाशी संबंधित आहे किंवा नाही, बीपीएल (दारिद्रय रेषेखालील) श्रेणीशी संबंधित आहे किंवा नाही यामुळे कोणताही फरक पडणार नाही या योजनेचा लाभ गोव्यातील सर्व महिलांना घेता येईल असे तृणमूल काँग्रेसच्या गोवा सह-प्रभारी महुआ मोइत्रा (Mahua Moitra) यांनी सांगितले होते.

तृणमुल काँग्रेसने गृहलक्ष्मी आधार योजना (Grihalakshmi Aadhar Yojana) लागू करण्याची घोषणा केल्यापासून गोव्यातील महिलांनी या योजनेला उत्तम प्रतिसाद दिला आहे. मडगावात महिलांकडून योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून 50 हजारापेक्षा जास्त महिलांनी स्वतःची नोंदणी केली आहे अशी माहिती तृणमुलच्या मडगावातील नेत्या व मडगावच्या (Margao) माजी नगराध्यक्ष डोरिस टेक्सेरा (Doris Texera) यांनी दिली.

गोव्यापेक्षा पाचपट जास्त लोकसंख्या असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ही योजना यशस्वीपणे राबविण्यात आली असून तिथे दरमहा महिलांना दीड हजार रुपये दिले जात आहेत. गोव्याची लोकसंख्या कमी असल्याने गोव्यात दरमहा महिलांना 5 हजार रुपये देण्याचा निर्णय तृणमूलने घेतला असून या योजनेमुळे गोव्यातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील असा दावा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केला आहे.

तृणमूल काँग्रेसने जाहीर केलेल्या गृहलक्ष्मी योजनेसाठी गोव्यातील 2.5 लाखांहून जास्त महिलांनी नोंदणी केली आहे, गृहलक्ष्मी योजनेसाठी 2.5 लाख नोंदणी झाल्याने एक मैलाचा टप्पा पार केला आहे. 65 टक्के लोकांपर्यंत ही योजना पोहोचल्याचा दावा गोव्यातील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना तृणमूल काँग्रेसच्या राज्य प्रभारी महुआ मोईत्रा यांनी केला. तसेच गोव्यातील तरुणांना 20 लाख रुपयांचे कर्ज देण्याबाबतची योजना टिएमसीने नुकतीच जाहीर केली असून या योजनेलाही युवकांचा मोठा प्रतिसाद लाभत असल्यासे सांगितले. गोव्यातील भाजप सरकार गृहआधार योजना राबवण्यास अपयशी ठरल्याच सांगत मुख्यमंत्री रोजगार योजनाही फसली असल्याची टिका मोइत्रा यांनी केला. गेल्या 10 वर्षात भाजप सरकारने महिलांसाठी काहीच केले नाही तृणमूलने जाहीर केलेल्या सर्व योजना नोंदणी प्रक्रियेसाठी सोप्या आहेत तेव्हा समस्त महिलांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मोइत्रा यांनी काल पत्रकार परिषदेत केले.

तृणमूल आपल्या योजनेच्या नोंदणीसाठी कुटुंबातील एका सदस्याचे नाव आणि संपर्क क्रमांकच नोंदवून घेत आहे आहे आणि गृहलक्ष्मी योजनेत सहभागी होण्याची प्रोसेस समजावून सांगत आहे. निवडणुका जवळ आल्याने राजकीय पक्ष गोव्यात आश्वासनांचा वर्षाव करत आहेत. गोव्यात आपली जागा करण्याच्या उद्देशाने तृणमूल काँग्रेसनेही यावेळी गोवन महिलांना मोठी दिली आहेत. कुटुंबातील प्रत्येक महिलेला गृहलक्ष्मी योजनेंतर्गत दरमहा 5,000 रुपये आणि संपूर्ण वर्षासाठी 60,000 रुपये मिळतील. या योजनेचे कार्ड लवकरच गोव्यातील महिलांना वितरित केले जातील. कार्डांवरील युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक तृणमूल पक्षाची सत्ता येताच अंमलात येण्याची हमी पक्षाने दिली आहे. गोव्यातील 3 लाख 50 हजार कुटुंबातील सर्व महिलांना ही योजना लागू होणार असल्याचे महुआ मोइत्रा यांनी स्पष्ट केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT