Arvind Kejriwal & Mamata Banerjee Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Assembly Election: गोव्यात TMC अन् AAP च्या एन्ट्रीने 'खेला होबे'

गोव्यात (Goa) गेल्या 10 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे, त्यामुळे त्यांना यावेळीही सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागत आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. 14 फेब्रुवारीला मतदार मतदान करणार आहेत. गोव्यातील विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ 4 फेब्रुवारी 2022 रोजी संपत आहे. राज्यात विधानसभेच्या 40 जागा आहेत. तर विधानसभेत बहुमताचा आकडा 21 चा आहे. गोव्यात 2017 मध्ये शेवटची विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election) झाली होती. गोवा विधानसभा निवडणूक-2017 मध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, परंतु भारतीय जनता पक्षाने (BJP) गोव्यात सरकार स्थापन केले. गेल्या निवडणुकीत गोव्यात मतदानाची टक्केवारी 83 टक्के होती.

दरम्यान, 2017 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 36 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी काँग्रेसने 17 जागा जिंकल्या होत्या. जे बहुमताच्या आकड्यापेक्षा 4 ने कमी होते. त्याच वेळी, भारतीय जनता पक्ष (BJP) ने 2017 च्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीत 36 जागांवर निवडणूक लढवली होती. 36 भाजपने 13 जागा जिंकल्या होत्या. गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP) ने 4 जागा लढवल्या आणि 3 जिंकल्या. आम आदमी पार्टीने 40 जागा लढवल्या परंतु एकही जागा जिंकता आली नाही.

गोवा निवडणूक 2017 मध्ये काय समीकरण होते?

गोव्यात सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आलेला काँग्रेस, गोवा फॉरवर्ड पक्षाबरोबर इतर लहान पक्षांच्या मदतीने तिथे सरकार स्थापन करु शकेल, असं सांगण्यात येत होतं परंतु काँग्रेस (Congress) आणि गोवा फॉरवर्ड पक्ष (Goa Forward Party) यांच्यात निवडणुकीपूर्वी किंवा नंतर कोणतीही औपचारिक युती झाली नाही. दरम्यान सत्ता स्थापन्यामधील नाट्यमय घडामोडीनंतर, भाजपने MGP, GFP आणि दोन अपक्ष आमदारांच्या मदतीने 21 चा आकडा मिळवत बहुमताचा आकडा पार केला आणि सरकार स्थापन केले. त्यानंतर गोव्यात पुन्हा एकदा भाजपला मनोहर पर्रीकरांच्या (Manohar Parrikar) रुपात मुख्यमंत्रीपदी मिळाले. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. त्यानंतर भाजपने डॉ. प्रमोद सावंत यांना राज्याचे नवे मुख्यमंत्री बनवले. 2017 गोवा विधानसभा निवडणुकीत प्रथमच VVPAT-सक्षम इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे राज्यभरात वापरली गेली.

सर्वेक्षण काय म्हणते

निवडणुकीचे काउंटडाऊन सुरु झाले आहे. गोवा निवडणुकीबाबतच्या जनमत सर्वेक्षणात आम आदमी पक्ष हा प्रमुख विरोधी पक्ष असल्याचे दिसत आहे. गेल्या वेळी सर्वाधिक 17 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला 4- 6 जागा मिळू शकतात. त्याचबरोबर तृणमूल काँग्रेसही (Trinamool Congress) पहिल्यांदाच आपला हात आजमावणार आहे. टीएमसी भाजप आणि काँग्रेसला मजबूत पर्याय बनू शकतो अशी शक्यता तृणमुल कॉंग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. टीएमसीच्या आक्रमक रणनीतीमागे प्रशांत किशोर यांचा हात आहे. तर गोव्यात गेल्या 10 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे, त्यामुळे त्यांना यावेळीही सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: बेपत्ता राजवीर सापडला; काणका पर्रा येथे लागला शोध

Saint Xavier Exposition: मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूताने घेतले संत फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाचे दर्शन; गोव्याचे केले विशेष कौतुक

Cash For Job: संशयितांच्या मालमत्तेची चौकशी करा! पोलिसांची शिफारस; कोट्यवधींची अफ़रातफर उलगडणार?

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT