Election Commission of India announces Assembly polls schedule for Goa
Election Commission of India announces Assembly polls schedule for GoaTwitter/@ANI

Goa Election 2022: निवडणुकीचं बिगूल अखेर वाजलं, 14 फेब्रुवारीला मतदान

निवडणुकीसाठी उमेदवारांना 25 लाख रूपये खर्चाची मर्यादा आखण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रांवर EVM आणि VVPAT चा वापर

Goa Election 2022: गोवा विधानसभा निवडणुकीचं बिगूल अखेर वाजलं आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणूकांची तारीख जाहीर केली आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा (Goa Assembly Election 2022) आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजलंय. ओमिक्रॉनचा वाढता धोका, कोरोनाच्या (Covid-19) आव्हानांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने (Election Commission of India) या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहे.

शनिवारपासून या राज्यांमध्ये आचारसंहिता लागू होणार आहे. कोरोना नियमांचे पालन करत या निवडणुका पार पडतील, असे आयोगाने म्हटलंय. पाच राज्यांमधील एकूण 690 विधानसभा जागांवर निवडणूका होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा (Sushil Chandra), निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत या तारखा जाहीर केल्या. (State legislative assemblies of India)

14 फेब्रुवारी 2022 रोजी एकाच टप्प्यात निवडणूका होणार आहे. उत्तर प्रदेशात 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत 7 टप्प्यात मतदान होणार आहे पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात 14 फेब्रुवारीला आणि मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्चला मतदान होणार असून 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

गोव्यात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार (Goa Election Schedule time date result)

गोवा विधानसभा निवडणूकीचा पहिला टप्पा

28 जानेवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख

29 जानेवारी अर्जांची पडताळणी

31 जानेवारी मागे घेण्याची मुदत

14 फेब्रुवारी निवडणूक

10 मार्च मतमोजणी

गोवा राज्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना 25 लाख रूपये खर्चाची मर्यादा आखण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रांवर EVM आणि VVPAT चा वापर केला जाईल. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेशा संख्येत ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटीची खात्री करण्यासाठी निवडणूक आयोगाने आधीच व्यवस्था केली असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येचा विचार करता मतदानाची वेळ एक तासाने वाढविण्यात आली आहे. सर्व प्रकाराच्या रॅलिवर बंदी घालण्यात आली आहे. सोशल मिडियावरून जास्तीत जास्त प्रचार करण्याचा आदेश आयोगाने दिला आहे. 15 जानेवारीपर्यंत रोड शो, रॅली, पदयात्रा काढता येणार नाही.

Election Commission of India announces Assembly polls schedule for Goa
पाचही राज्यांतील विधानसभा उमेदवारांच्या खर्च मर्यादेत 'इतकी' वाढ

40 जागांच्या गोवा विधानसभेचा कार्यकाळ 15 मार्च रोजी संपत आहे. राज्यातील शेवटच्या विधानसभा निवडणुका फेब्रुवारी 2017 मध्ये झाल्या होत्या. 15 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला, पण सरकार स्थापन करू शकला नाही. भाजपने 13 जागा जिंकल्या आणि MGP, GFP आणि दोन अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्यात यश मिळविले. मनोहर पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री झाले, परंतु 17 मार्च 2019 रोजी मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) राज्याचे मुख्यमंत्री झाले.

Election Commission of India announces Assembly polls schedule for Goa
'आगामी गोवा विधानसभा निवडणुका पार पाडण्याचे आयोगासमोर आव्हान'

2022 च्या सुरुवातीला गोव्याच्या निवडणुका होणार आहेत, पण यावेळी केवळ काँग्रेस (Congress) आणि भाजपच नाही तर ममता बॅनर्जींच्या टीएमसी आणि आम आदमी पार्टीही नशीब आजमावण्यासाठी उतरल्या आहेत. गोव्यात गेल्या 10 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे, त्यामुळे त्यांना सत्ताविरोधी लाटेचाही सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत भाजप (BJP) अध्यक्ष जेपी नड्डा पूर्ण गोव्यात आपली पुर्ण ताकद लावत आहेत. त्याच वेळी, काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्यासाठी धडपडत आहे, परंतु टीएमसी त्यांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा बनला आहे. काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून टीएमसीमध्ये (TMC) दाखल झाले आहेत. 2017 मध्ये सामान्य माणूस खाते उघडू शकला नसला तरी यावेळी तो किंगमेकर बनण्याच्या प्रयत्नात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com