Goa Assembly Election 2022  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोव्यात गंभीर राजकीय सांस्कृतिक प्रश्न?

पुढच्या महिन्यातच गोवा (Goa Assembly Election) राज्य विधानसभेच्या निवडणुकीला सामोरा जाणार आहे.

दैनिक गोमन्तक

दैनिक गोमंतकचे गोव्यातल्या सांस्कृतिक घडामोडींची दखल आवर्जून घेते. आता या बातमीत पारंपारिकदृष्ट्या सांस्कृतिक म्हणावे असे काहीच नाही वगैरे आपण नक्कीच म्हणू शकाल.

किती वर्षे आपण बिहार (Bihar) , उत्तर प्रदेश किंवा अशाच कुठल्या तरी दूर वसलेल्या राज्यांकडे बोट दाखवून सांगणार, ‘पहा कसा गुन्हेगारांचा शिरकाव होतो आहे राजकारणात! त्या राज्यांची संस्कृतीच तसली आहे- ‘बाहुबलींची’!’. त्यामुळे झपाट्याने राष्ट्रीय प्रवाहात सामील होऊ पाहणाऱ्या आपल्या गोवा (Goa) राज्यानेदेखील या गुन्हेगार ‘बाहुबली’ संस्कृतीशी देखील तसेच झपाट्याने मिळवून घ्यायचे ठरवले असेल. त्यामुळेच तर ‘गंभीर गुन्ह्यांचा’ आरोप असणाऱ्या आमदारांची संख्या आणि टक्केवारी गोव्याच्या विधानसभेत दर निवडणूकीदरम्यान वाढवत नेण्याचे शिजले नसेल ना?

1963-64 च्या विधानसभेत अठ्ठावीस आमदारांपैकी पाच जण स्वातंत्र्यसैनिक होते, चार जण वकील होते व तीन डॉक्टर होते. तर आताच मावळलेल्या या विधानसभेच्या 40 आमदारांपैकी 11 जण, ज्यांच्यावर गंभीर गुन्ह्याचे आरोप आहेत, असे लोकप्रतिनिधी आहेत. तर ही नवसांस्कृतीक प्रगती ही अशी आहे. पुढच्या महिन्यातच गोवा (Goa Assembly Election) राज्य विधानसभेच्या निवडणुकीला सामोरा जाणार आहे. युवा मतदारांची संख्या गोव्यात सुमारे 38 टक्के आहे. अशी भरगच्च युवा मतदारांची संख्या असलेल्या आपल्या या राज्यात त्यांच्यासमोर उमेदवार (Candidate) कोण आहेत तर हे 11 जण, ज्यांच्या नावे गंभीर गुन्हे नोंदले गेले आहेत ते (टक्केवारीने 23 अशी प्रभावी संख्या असलेले) आमदार. ही तर एकापरीनं गोव्याच्या (Goa) नव्या राज्यकीय संस्कृतीची पहाट आहे आणि ज्या प्रकारे निवडणुकीच्या तोंडावर आज जी चिखलधुमाळी माजलेली दिसत आहे, ती पाहता या संस्कृतीचीही सवय आम्हा गोमंतकीयांना करून घेणे भाग आहे, हे अगदी स्पष्ट दिसते आहे.

या संस्कृतीची (Culture) प्रगती गेल्या काही वर्षात कशी घडली आहे ते पहा- 2007 साली विधानसभेत जिंकून आलेल्या आमदारांपैकी 9 आमदारांवर, म्हणजे 23% आमदारांच्या नावांवर साधारण गुन्ह्याची नोंद झाली होती पण त्यापैकी एकाचाही नावावर गंभीर गुन्ह्याची नोंद नव्हती. 2012 च्या विधानसभेतल्या 40 आमदारांपैकी 12 आमदारांवर (30 टक्के) साधारण गुन्ह्याची नोंद होती तर 2 आमदारांवर (5 टक्के) गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. 2017 सालच्या विधानसभेने मात्र गंभीर गुन्ह्यांच्या बाबतीत अतिशय छान प्रगती केली. 5 टक्क्यांवरून हा आकडा वाढून एकदम 22.5 टक्क्यांवर पोहोचला. 40 पैकी 9 आमदार गंभीर गुन्हेवाले होते तर साधारण गुन्हेवाले आमदार तरीही 11 होते (27 टक्के). आपली पुढची विधानसभा अवघ्या काळाच्या अंतरावर आहे. या राजकीय नवसंस्कृतीचा हा आलेख किती चढा असेल हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

नावावर गुन्हे नोंद असलेल्यांनी निवडून येण्याच्या संख्येचा उंच जाणारा गेल्या काही वर्षांचा आलेख पाहता, या ‘बाहुबली’ मंडळींच्या टक्केवारीचा आलेख आताही तसाच चढा राहील का हाच सर्वात गंभीर असा सांस्कृतिक प्रश्न आहे.अनेकांना तो सांस्कृतिक वाटत नाही ही गोष्ट वेग़ळी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT