Sudin Dhavalikar 

 

Dainik Gomantak 

गोवा निवडणूक

'सुंठीवाचून खोकला गेला'

प्रवीण आर्लेकर यांच्या बाबतीत बोलताना 'सुंठीवाचून खोकला गेला',अशी सुदिन ढवळीकर यांनी प्रतिक्रिया दिली.

Akash Umesh Khandke

पणजी: भाजपने यापूर्वी आमदार फोडले आता ते संभाव्य उमेदवार फोडत आहेत. यावरून पक्षाची दयनीय स्थिती लक्षात येते, अशी घणाघाती टीका मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली आहे. लाखो सभासदांचा दावा ठोकणारा आणि संघटनात्मक कामाचा डांगोरा पिटणारा पक्ष इतर पक्षांचे संभाव्य उमेदवार पळवू कसा शकतो ? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

यावेळी दीपक ढवळीकर यांच्यासह पक्षाचे संभाव्य उमेदवार आणि कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी भाजप (BJP) सरकारवर टीका करत सरकार विविध प्रश्नांवर लोकांची फसवणूक करत असून इतर पक्षांचे संभाव्य उमेदवार पळवून नेत आहे. यातच मगो पक्षाचा (MGP) विजय असून भाजपचा नैतिक पराभव असल्याचंही ते म्हणाले.

वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॅकमेलिंग करून आमच्या पक्षाचे संभाव्य उमेदवार पळवून नेले जात आहेत. पण जनता मगो आणि तृणमूल काँग्रेसच्या (TMC) पाठीमागे असून, ते या युतीला विजयी करतील. पुढील १० दिवसांत मोठ्या घडामोडी अपेक्षित असून अनेक नेते, कार्यकर्ते मगोच्या संपर्कात असून ते पक्षात प्रवेश करतील असेही ते म्हणाले.

भाजप सरकारचा नवा घोटाळा समोर

विधिमंडळामध्ये भाजपने खनिज महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली. मात्र, हे महामंडळ अस्तित्वात येण्यापूर्वीच डंप हाताळणीसाठी धोरणात्मक दुरुस्ती केली आणि दहा ते वीस दशलक्ष टन खनिज हाताळणी, विक्रीस काढण्याचा निर्णय जाहीर केला. राज्यात सध्या तरी शंभरहून अधिक दशलक्ष टन डंप आहेत. यावरून हा नवा घोटाळा समोर येत आहे अशी टीका ढवळीकर यांनी केली.

प्रवीण आर्लेकर (Pravin Arlekar) यांनी आमच्या पक्षाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप, मगो पक्षाचे संभाव्य उमेदवार पळवून नेत आहे. यातच भाजपचा पराभव असून मगोपचा विजय आहे. प्रवीण आर्लेकर यांच्या बाबतीत ''सुंठीवाचून खोकला गेला'' ही आपली प्रतिक्रिया आहे.

- सुदिन ढवळीकर, आमदार, मगो पक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT