पणजी: मोदी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप करत, काँग्रेसचे सरचिटणीस तारिक अन्वर यांनी गुरुवारी सांगितले की, भाजपने देशातील सामाजिक समतेचे आणि एकोप्याचे वातावरण नष्ट केले आहे. अन्वर गुरुवारी पणजीत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी काँग्रेसच्या संशोधन विभागाचे अध्यक्ष प्रा. एम. व्ही. राजीव गौडा, प्रवक्त्या अलका लांबा आदी उपस्थित होते.
अन्वर पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी 2014 ला विकास पुरुष म्हणून लोकांसमोर आले होते. अनेक आश्वासन दिली होती. मात्र, मोदींनी दिलेली सर्व आश्वासने आज अपूर्ण राहिली आहेत. याबरोबर देशातील जनतेने उपस्थित केलेले प्रश्न सोडवण्यात मोदी अपयशी ठरले आहेत. देशाची सर्वच परिस्थिती बिघडत चालली आहे. देशाची सामाजिक समता, जातीय सलोखा नष्ट होत आहे. याला केवळ मोदी जबाबदार आहेत.
ते पुढे म्हणाले, की देश बेरोजगारीच्या समस्येने ग्रासलेला आहे आणि भाजपने त्यावर तोडगा काढण्यासाठी काहीही केले नाही. नोकरीच्या संधी नसल्याने तरुण निराश झाले आहेत. रोजगार निर्माण करण्यात भाजप अपयशी ठरला आहे. याशिवाय दिवसेंदिवस महागाई वाढत असून गरीब लोक त्रस्त आहेत.
प्रा. एमव्ही राजीव गौडा यांनी ७ आणि ८ फेब्रुवारी २०२२ रोजी झालेल्या लोकसभा आणि राज्यसभेतील पंतप्रधानांच्या भाषणांमधील खोटेपणा उघड केला. काँग्रेस पक्ष तुकडे तुकडे टोळीचा नेता बनला आहे, असे म्हणणाऱ्या मोदींच्या विधानाचा पर्दाफाश करून गौडा म्हणाले की, भाजप सरकार हा शब्द वापरण्यास घाई करत आहे, “तुकडे तुकडे म्हणजे काय याची माहिती स्वत: सरकारकडे नाही. ही टोळी आहे किंवा तिचे सदस्य कोण आहेत, याचीही माहिती त्यांच्याकडे नाही. आम्ही लोकशाहीवर ठाम विश्वास ठेवतो आणि आम्ही असेही मानतो की टीका हा लोकशाहीचा एक आवश्यक भाग आहे, परंतु कोणी सरकारच्या विरोधात बोलले तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.