Aditya Thackeray
Aditya Thackeray  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

शिवसेना गोव्यातील सर्व निवडणुका लढवणार: आदित्य ठाकरे

दैनिक गोमन्तक

पणजी: आगामी काळात शिवसेना गोव्यातील सर्व निवडणुका लढवणार आहे. भाजपशी मैत्री असल्याने शिवसेनेने यापूर्वी गोव्यात लक्ष घातले नव्हते. मात्र, भाजपने महाराष्ट्रात आमचा विश्वासघात केला. आम्ही आता गोव्यावर लक्ष केंद्रित करू, असे शिवसेना नेते तथा महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले. पणजीत शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गोवा विधानसभा निवडणूक शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्रित लढवत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 12 तर शिवसेनेचे 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेचे पणजीतील उमेदवार शैलेंद्र वेलिंगकर यांनी अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देत स्वतः माघार घेतली आहे.

पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, गोव्यात शिवसेना म्हणजे काय आहे हे, जनतेला समजायला लागले आहे. गोव्यातल्या भूमिपुत्रांना न्याय कसा द्यायचा हे शिवसेनेकडून समजून घेतले पाहिजे. आम्ही महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) केलेले काम वाखाणण्याजोगे आहे.

यावेळेस ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर बोचरी टीका केली. ते म्हणाले, गोव्यात शिवसेनेने (Shiv Sena) निवडणूक लढवल्याने मतांचे विभाजन होईल. शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉजिट जप्त होईल, असे असेल तर टीकाकार आमच्याबद्दल चर्चा का करतात? ते आम्हाला महत्व देतात कारण त्यांना माहिती आहे की गोवाच्या राजकारणात शिवसेनेचे भक्कम स्थान आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

Vasco News : सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण कोळशासाठी : कॅ. विरियातो फर्नांडिस

Lok Sabha Election 2024: ‘’चिदंबरम यांनी भ्रष्टाचार वाढवला, आरबीआयकडून सांगण्यात यायचे...’’; राजीव चंद्रशेखर यांचा हल्लाबोल

Cashew Farmer : निवडणुकीच्या धामधुमीत काजू उत्‍पादक वाऱ्यावर; उत्पादन कमी १६ हजार जणांना फटक

SCROLL FOR NEXT