गोवा निवडणूकः गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेने पणजी मतदारसंघातून आपला उमेदवार मागे घेतला आहे. भाजपकडून (BJP) तिकीट न मिळाल्याने उत्पल अपक्ष म्हणून पणजी मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. (Shivsena will campaign for Utpal Parrikar)
याआधीही शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सर्व विरोधी पक्षांना आवाहन केले होते की, भाजपकडून तिकीट न मिळाल्यास सर्व पक्षांनी उत्पल यांना पाठिंबा द्यावा, जेणेकरुन त्यांचा विजय निश्चित होईल.
महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना टॅग करत संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "आम्ही आमच्या मुद्द्यावर ठाम आहोत. शिवसेना पणजीतून आपला उमेदवार शैलेंद्र वेलिंगकर (Shailendra Welingkar) मागे घेत आहे. एवढेच नाही तर आमचे कार्यकर्ते उत्पल पर्रीकर यांना पूर्ण पाठिंबा देतील. असा आमचा विश्वास आहे. पणजीची लढाई केवळ निवडणुकीसाठी नाही, तर गोव्याच्या राजकीय शुद्धीकरणाचीही आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.