Election  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोव्यात आज संध्याकाळपासून पुढील 2 दिवस कलम 144 लागू

निवडणूक आयोगाने गोव्यात एक्झिट पोल जाहीर करण्यावर बंदी घातली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात शनिवारी सायंकाळी 6 पासून 14 फेब्रुवारीच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. (Goa Election News)

दरम्यान, पाच किंवा जास्त व्यक्ती जमा होण्यास, मिरवणूक, रॅली आयोजित करण्यास किंवा बैठका आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पैशांचे आणि दारू वाटण्याचे प्रकार टाळण्यासाठी मतदानाच्या दिवशी निर्वाचन घेतलेली वाहने वगळून उमेदवारांना प्रचारासाठी परवानगी दिलेली सर्व वाहने बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. याकाळात खासगी वाहनांचीही तपासणी होईल. निवडणुकीच्या (Election) कालावधीत बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गोव्यातील (Goa) सर्व परवानाधारक मद्यविक्री दुकाने 12 फेब्रुवारी संध्याकाळी 6 पासून ते 14 फेब्रुवारी पर्यंत बंद राहतील. त्याचबरोबर मतमोजणी 10 मार्च रोजी करण्यात येणार असून या दिवशी देखील गोवा राज्यातील सर्व मद्यविक्री दुकानांना कुलूप असेल, अशी माहिती समोर येत आहे.

पुढील काही दिवसात गोव्यासह पाच राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) पाचही राज्यात एक्झिट पोल जाहीर करण्यावर बंदी घातली आहे. ही बंदी 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 7 मार्चच्या सायंकाळी 6:30 पर्यंत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: कुडचडे पोलिस स्टेशनजवळ झालेल्या अपघातात स्कूटर चालक जखमी

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

SCROLL FOR NEXT