Goa Elections 2022: Savitri Kavalekar Dainik Gomantak
गोवा निवडणूक

बोलण्यापेक्षा अधिक काम करून दाखवू: सावित्रींचा निर्धार

Shreya Dewalkar

सांगे: विरोधकांनी माझ्यावर नाहक आरोप करूनही माझे कार्यकर्ते कोणत्याही परिस्थितीत न खचता माझ्यासाठी विजयश्री खेचून आणण्यासाठी अंतिम टप्प्यात पोहचले आहेत. विरोधकांना पराभूत करण्यासाठी माझे कार्यकर्ते पायाला भिंगरी बांधून फिरत आहे. निष्ठावंत कार्यकर्ते तहान भूक विसरून आपल्या विजयासाठी कष्ट घेत असल्याचा दावा, सांगेचे अपक्ष उमेदवार सावित्री कवळेकर (Savitri kavalekar) यांनी केला. (Savitri statement on background of goa election 2022)

गावोगावी फिरताना मतदारांकडून जो प्रतिसाद मिळत आहे, तो पाहता विरोधकांनी आपल्या मागे सरकारी यंत्रणा लावून प्रचार कार्यात खंड पडण्याचा प्रयत्न केला जात आहे. याउलट आपल्या कार्यकर्त्यांकडून कोणाहीविरुद्ध एकही तक्रार केली जात नाही. कारण जनतेने आपला निर्णय केलेला आहे असा आत्मविश्वास सावित्री कवळेकर यांनी व्यक्त केला. प्रचाराच्या दुसऱ्या फेरीत जोरदार प्रवेश केला असून आपले स्वागत ज्या पद्धतीने जनता करत आहे, ते पाहता जनता आपल्या पाठिशी असल्याचे सिद्ध होते, असेही त्या म्हणाल्या.

आता कोपरा सभांवर भर देणार...

सांगे मतदारसंघात (Sanguem Constituency) जसा विकास हवा त्या प्रमाणात अजून झालेला नाही. अजूनही पाणी, रस्ते ह्या समस्या आहेत. शिवाय नेटवर्क विषयही सुटलेला नाही. रोजगार उपलब्ध करून देण्यास विरोधक अपयशी ठरले आहेत. गेल्या पाच वर्षात आपण विविध स्थरावर केलेले कार्य सांगेतील जनता वाया जाऊ देणार नाही. शेवटच्या टप्प्यात कोपरा सभावर भर दिला जाणार असून, विरोधक आपल्याविरुद्ध जो अपप्रचार करीत आहेत त्याला चोख उत्तर दिले जाईल, असे सावित्री म्हणाल्या.

बोलण्यापेक्षा कामच अधिक करेन...

आपण निवडणूक (Goa Assembly Election) लढताना शत्रूला कमजोर न मानता शत्रूचा सामना कसा करायचा ते आपल्या कार्यकर्त्यांना वेळोवेळी पटवून दिले आहे. प्रचारात केवळ बोलण्यापेक्षा जनतेची अधिक कामे करून दाखवणार आहे. बाता मारणाऱ्यांना सांगेतील जनता घरी पाठवते. त्याचा अनुभव विरोधकांनी घेतला आहे. त्यामुळे आपले कार्य माझ्या कार्यपद्धतीतून दिसून येईल, असे आश्वासन सावित्री कवळेकर यांनी दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: हणजूण येथे कंस्ट्रक्शन साइटवरुन पडून पश्चिम बंगालच्या मजूराचा जागीच मृत्यू!

Goa Vacation: बस, ट्रेन, विमान! सुट्टीत पुणे, मुंबईतून गोव्याला जाण्यासाठी कोणता पर्याय चांगला, किती रुपये मोजावे लागतील?

Borim News: गोव्यासाठी गुड न्यूज! बोरी पुलासाठी भारत सरकारकडून अधिसूचना जारी; लवकरच होणार पायाभरणी

Goa Dengue Cases: मडगावात डेंग्यूचे तुरळक प्रमाणात रुग्ण! तातडीने उपाययोजना केल्याचा परिणाम

Harvalem Panchayat: कोण बाजी मारणार? हरवळे पंचायत निवडणूकीवर सर्वांचे लक्ष

SCROLL FOR NEXT