Sanjay Raut support Utpal Parrikar for Goa Election 2022 Dainik Gomantak
गोवा निवडणूक

उत्पल यांच्या विजयासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने पाठिंबा द्यावा; राऊतांचे आवाहन

गोव्यात कोणालाही बहुमत मिळणार नाही, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

दैनिक गोमन्तक

गोव्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणुका (Goa Election 2022) लक्षात घेता गोव्यात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी 14 फेब्रुवारीला एका टप्यात मतदा होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) विधानसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर केल्यापासून निवडणुकीची लाट गोव्यात आली आहे. राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधक चांगलचे तयारीला लागले आहेत. राजकीय नेते प्रचारसभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतांना दिसत आहे. अशातच उत्पल पर्रिकरांच्या भाजप तिकिटावरून राजकारणी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. 'गोव्यात कोणालाही बहुमत मिळणार नाही,' असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आज आहे.

शिवसेनेचे (ShivSena) खासदार संजय राउत (Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. "मनोहर पर्रीकर यांनी गोव्याच्या विकासात मोठे योगदान दिले, परंतु त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला अनादराचा सामना करावा लागला. त्यांचा मुलगा उत्पल पर्रीकर यांना पणजीतून भाजपने तिकीट दिलेच पाहिजे. निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाने त्यांना पाठिंबा देऊन पर्रिकर पुत्राला सत्तेत आणले पाहिजे," असे शिवसेना नेते संजय राऊत मुंबईत बोलत होते.

दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी आगामी विधानसभा निवडणूक पणजी मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढविण्याचा निर्णय घेतल्यास त्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमवारी गोव्यातील सर्व बिगरभाजप पक्षांना केले. काँग्रेस, आम आदमी पार्टी (AAP), तृणमूल काँग्रेस (TMC) आणि गोवा फॉरवर्ड पार्टी या गैर-भाजप (BJP) पक्षांनी उत्पल यांच्या विरोधात उमेदवार उभा केला नाही तर हीच भाजपच्या दिवंगत ज्येष्ठांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे शिवसेना खासदार राउत म्हणाले.

भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच म्हटले होते की, पक्ष एका नेत्याचा मुलगा आहे म्हणून गोवा विधानसभा निवडणुकीसाठी कोणालाही तिकीट देऊ शकत नाही. पणजीचे प्रतिनिधित्व सध्या भाजपचे आमदार बाबुश मोन्सेराते करत आहेत, जे 2019 मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. उत्पल यांनी राज्याच्या राजधानीतून उमेदवारीसाठी लॉबिंग केल्याचा अहवाल देत बाबूश यांना आगामी निवडणुकीत भाजपकडून पुन्हा उभे केले जाण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bits Pilani: 'कुशाग्र'च्या मृत्यूमागे एनर्जी ड्रिंक अतिसेवनाचा संशय! व्हिसेरा राखून ठेवला; फुफ्फुस, मेंदूला इजा

Rashi Bhavishya 18 August 2025: व्यवसायात प्रगती,कुटुंबातील मतभेद मिटतील; आर्थिक बाबींमध्ये सकारात्मक बदल होईल

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

America Firing: गोळीबाराने हादरले 'न्यूयॉर्क'! नाइट क्लबमध्ये बेछूट गोळीबार, 3 ठार, 8 जखमी

SCROLL FOR NEXT