Goa Elections 2022

 

Dainik Gomantak

गोवा निवडणूक

Goa Election Update: ...यामुळे प्रभुदेसाई यांची मडगावातून माघार

भाजपचे मडगावचे उमेदवार म्हणून ज्यांचे नाव पुढे आणले होते ते मडगावतील बिल्डर डॉ. देश प्रभुदेसाई (Dr. Desh Prabhudesai) यांनी मडगाव भाजपातील (BJP) गटबाजीला कंटाळून रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्राप्त झाली.

दैनिक गोमन्तक

Goa Election Update: भाजपचे मडगावचे उमेदवार म्हणून ज्यांचे नाव पुढे आणले होते ते मडगावतील बिल्डर डॉ. देश प्रभुदेसाई (Dr. Desh Prabhudesai) यांनी मडगाव भाजपातील (BJP) गटबाजीला कंटाळून रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्राप्त झाली. मडगाव भाजपातील गटबाजी पाहता येथून निवडणूक (Goa Elections) लढविणे कठीण असे त्यांनी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanawade) आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांना कळविले आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

यासंबंधी डॉ. प्रभुदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट माहिती न देता मडगावतील वस्तुस्थिती आपण राज्यस्तरीय नेत्यांना कळविली आहे, असेच सांगितले. मडगाव भाजपातील गटबाजी मिटविण्यासाठी यावेळी नवीन उमेदवार म्हणून प्रभुदेसाई यांचे नाव सुचविण्यात आले होते. त्रयस्थ उमेदवार असल्याने सर्व गट एकत्र येऊन काम करतील अशी अपेक्षा होती. मात्र प्रभुदेसाई याना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाई नायक यांनी यावेळी आपण व आपले कार्यकर्ते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांच्या बरोबर अशी उघड भूमिका घेतली होती. तर प्रभुदेसाई यांच्या कार्यालय उद्घाटनाच्या कार्यक्रमावर मंडळ अध्यक्ष रुपेश महात्मे आणि सरचिटणीस केतन कुरतरकर यांनी बहिष्कार घातला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT