Ravi Naik Dainik Gomantak
गोवा निवडणूक

'फोंडा गोव्यातील तिसरा जिल्हा बनवणार' : रवी नाईक

फोंडा मतदारसंघाला आदर्श, समृद्ध करणार असल्याचाही दावा

दैनिक गोमन्तक

फोंडा मतदारसंघाला जे काही चांगले ते देण्याचा सातत्याने प्रयत्न केला. फोंडा मतदारसंघात अनेक विकास प्रकल्प उभारले. त्यात आयडी उपजिल्हा इस्पितळ, राजीव कलामंदिर, क्रीडा संकूल, जलतरण तलाव, विश्रामगृह, बगल रस्ते, शासकीय संकूल आदी अनेक कामांचा समावेश आहे. आता फोंडा आदर्श मतदारसंघ बनवून येथील फोंडा तालुक्याबरोबरच लगतच्या भागातील लोकांच्या सोयीसाठी तिसरा जिल्हा करण्याचा मानस आहे. याशिवाय अद्ययावत सुविधांनी युक्त भव्य वाचनालय आणि इतर विकासकामे साकारायची आहेत. आतापर्यंत फोंड्यातील मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, आताही ते देतील, असा विश्‍वास माजी मुख्यमंत्री, फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी गोमन्तकशी बोलताना व्यक्त केला. (Ravi Naik News Updates)

प्रश्न : फोंडा मतदारसंघातील योगदानाबद्दल काही सांगाल काय?

उत्तर : फोंडा मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मतदारांनी माझ्यावर विश्‍वास ठेवला आणि त्या विश्‍वासाला पात्र ठरलो, याचे फार मोठे समाधान आहे. मतदारसंघात आवश्‍यक विकासकामे पूर्ण करताना जनतेला जे चांगले आहे ते देण्याचा सातत्याने प्रयत्न केला. आतापर्यंत फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळाची उभारणी, राजीव कलामंदिर, क्रीडा संकूल, जलतरण तलाव, बगल रस्ते, विश्रामगृह, शासकीय संकूल असे अनेक प्रकल्प साकारले. लोकांचे सहकार्य त्यासाठी लाभले. त्यामुळे इतर कुठल्याही मतदारसंघात जेवढे काम झाले नसेल तेवढे फोंडा मतदारसंघात झाले आहे याचे हे समाधान आहे.

प्रश्न : आता नव्या संकल्पनेविषयी काय?

उत्तर : फोंड्यात अनेक विकास प्रकल्प साकारले, तरीही प्रशासन तुमच्या दारीचा अनुभव नागरिकांना येण्याची फार गरज आहे. फोंडा मतदारसंघाबरोबरच तालुक्यातील इतर लोकांना शासकीय कामांसाठी जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या पणजी आणि मडगावला धाव घ्यावी लागते. त्यात वेळ आणि पैसाही खर्च होतो, त्यामुळे फोंड्यातच जर तिसरा जिल्हा झाला तर फोंडा तालुक्याबरोबरच मोले, कुळे, उसगाव, गुळेली, पाळी आदी लगतच्या भागांनाही ते सोयीस्कर ठरणार आहे. तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय फोंड्यातील कृषी पणन महामंडळाच्या भव्य वास्तूत करणेही शक्य आहे. त्यासाठी मागच्या काळात पाहणीही झाली होती. मुख्यमंत्र्यांसह (CM) इतर संबंधितांनी याची पाहणी केली, पण मध्यंतरी काही अडचण आली, आणि हा प्रस्ताव बारगळला. पण आता नव्याने हा प्रस्ताव पुढे नेण्यात येणार असून मुख्यमंत्री प्रमोद सावंतही (Pramod Sawant) त्याला अनुकूल आहेत.

प्रश्न : फोंडा परिसर म्हणजे शारदेचे प्रांगण म्हटले जाते, तरीही शैक्षणिक क्षेत्रात आणखी काही करायचे आहे का?

उत्तर : निश्‍चितच. फोंडा हे शारदेचे प्रांगणच आहे. फोंड्यात (Ponda) अनेक अभ्यासक्रमांची महाविद्यालये आहेत. त्यामुळे शैक्षणिक सुविधा बऱ्यापैकी उपलब्ध आहेत. अनेक विद्यार्थी फोंड्यात येतात. त्यात दूरवरच्या आणि गरीब व गरजू कुटुंबातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. अशा विद्यार्थ्यांना सोयीस्कर व्हावे तसेच वाचकांना वाचनासंबंधीची उत्कृष्ट सोय उपलब्ध व्हावी यासाठी तिस्क - फोंडा येथे आरोग्य खात्याची वास्तू आहे, तेथेच हे भव्य वाचनालय उभारू.

प्रश्न : फोंड्यातील अन्य विकासकामांबद्दल काय सांगाल?

उत्तर : मघाशी सांगितल्याप्रमाणे फोंड्यात अनेक विकासकामे साकारली आहेत. विकास ही निरंतर प्रक्रिया आहे. त्यामुळे इतर कामे सुरूच राहणार आहेत. रस्ते, वीज, पाणी आदीची काही ठिकाणी समस्या उद्भवली तर ती कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. येणारा काळ हा फोंड्यासाठी निश्‍चितच समृद्धीचा असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chodan Bridge: चोडणवासीयांची 33 वर्षांची प्रतीक्षा संपली! 'चोडण पुला'साठी 274.83 कोटींची निविदा, तीन वर्षांत पूर्ण होणार पूलाचं बांधकाम

CM Dev Darshan Yatra: 'मुख्यमंत्री देवदर्शन यात्रे'साठी दहा कोटी रुपयांची तरतूद! मंत्री फळदेसाई यांची माहिती

Arpora Nightclub Fire: 'बर्च क्लब'च्या मालकाचे आणखी काही कारनामे चर्चेत, 'मेझन्स रिसॉर्ट'च्या अग्निशमन 'NOC'चा गैरवापर; चौकशीतून माहिती उघड

South Goa Accident Cases: 'दक्षिणे'त अपघातांचे प्रमाण घटले, 2024 च्या तुलनेत 2025 काहीसे दिलासादायक

Sanjivani Sugar Factory: 'संजीवनी'च्या पुनरुज्जीवन प्रक्रियेला गती, निविदा मुदत 5 फेब्रुवारीपर्यंत वाढवली; प्रकल्पासाठी 4 कंपन्यांकडून उत्सुकता

SCROLL FOR NEXT