Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा निवडणूक

काब्रालबाब हे वागणं बरं नव्हं! खरी कुजबूज

काही राजकारणी निवडणूक जिंकण्यास लहान मुलांचाही वापर करायला लागले आहेत

Shreya Dewalkar

काब्रालबाब हे वागणं बरं नव्हं!

‘लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण’ या म्हणीची आठवण होण्याचे कारण म्हणजे आपले काही बेशिस्त राजकारणी. कोरोनाचा कहर असल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांना कोविडपासून वाचविण्यासाठी आपण धडपडतो. मात्र, काही राजकारणी निवडणूक जिंकण्यास लहान मुलांचाही वापर करायला लागले आहेत. परवा कुडचडेचे भाजपा उमेदवार व मंत्री नीलेश काब्राल (Nilesh Cabral) शालेय मुलांना घेऊन प्रचार करताना दिसले. काब्राल साहेब ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण’ ही म्हण आपण ऐकली नसणार! ∙∙∙

डेरीकचा मतदारांना आहेर!

निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवार कोणती आणि कसली आश्वासने देतात, याचा काहीही नेम नसतो. कोण तीर्थयात्रेचे तर कोण मोफत घर, वीज, पाणी एवढेच काय मोफत घर आणि नोकरीचीही आश्वासने मतदारांना देतात. कुंकळ्ळीचे अपक्ष उमेदवार डेरीक डायस यांना कपाट निवडणूक चिन्ह मिळाले आहे. या महाभागाने आपण निवडून आल्यास लग्न होणाऱ्या प्रत्येकाला एक लाकडी कपाट आहेर देण्याचे वचन दिले आहे. 14 तारखेला मतदान यंत्रावर कपाटाचे बटन दाबा व कपाट बुक करा, असा संदेश डेरिकने दिला आहे. गोव्यात (Goa) लग्नात मुलीला कपाट, सोफा, खाट व इतर सामान माहेरून भेट देण्याची परंपरा आहे. आता डेरिकसाहेब निवडून आल्यास कुंकळ्ळीतील मुलींना माहेरचे कपाट भेट देणार आहेत. ∙∙∙

(political gossip about nilesh cabral backround goa assembly election)

...आणि सार्दिन निघून गेले

कुडतरीचे काँग्रेस उमेदवार मोरेन रिबेलो हे आपण जिंकणार असल्याचा दावा करत असले, तरी कुडतरीत सगळेच आलबेल असल्याचे दिसत नाही. शनिवारी याचा प्रत्यय फ्रान्सिस सार्दिन यांच्या पत्रकार परिषदेवेळी दिसून आला. शनिवारी मडगावच्या काँग्रेस कार्यालयात सार्दिन यांची पत्रकार परिषद होती. तिथे मोरेन रिबेलो हेही उपस्थित होते. मात्र, सार्दिन यांनी आपले म्हणणे पत्रकारांसमोर मांडले आणि ते सरळ उठून चालते झाले. मागे मोरेन काय बोलतात तेही त्यांनी ऐकले नाही. या निवडणुकीत सार्दिन यांनी आपले पुत्र शॅलोम यांना कुडतरीची उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती, पण त्यांचे म्हणणे कुणी ऐकून घेतले नाही. त्यामुळे ते रागावून गेले असे सांगितले जाते. सार्दिन यांना पुत्रप्रेम पक्षप्रेमापेक्षा जास्त महत्त्वाचे वाटते का? ∙∙∙

खाणी सुरू करण्याच्या वल्गना

सावर्डे मतदारसंघात यावेळेला जोर लगाके...सुरू आहे. येथील उमेदवारांकडून पंचसदस्यांना इकडून तिकडे वळवण्याचे जोरदार प्रयत्न सध्या सुरू आहेत. सावर्डेचे माजी मंत्री दीपक पाऊसकर आणि भाजपचे उमेदवार गणेश गावकर तर मगोचे उमेदवार विनायक गावस यांच्यात ही तिरंगी लढत होत आहे. या तिघांपैकी कोण बाजी मारेल हे सांगणे कठीण असल्याचे खुद्द मतदारच सांगतात. तसे पाहिले तर सावर्डे मतदारसंघात प्रचाराचा मुद्दा हा बंद खाणी ठरला आहे. त्यामुळे भाजप निशाण्यावर आहे. खाणी का सुरू झालेल्या नाहीत, याचे उत्तर देणे तसे अवघडच आहे; पण नजीकच्या काळात खाणी सुरू करू, असे आश्‍वासन भाजप देत असला तरी तिकडे विरोधी पक्षांनी महिन्याभराच्या काळात खाणींविषयी चांगली बातमी देऊ, असे आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे आता कुणाचे ऐकायचे आणि कुणाला मत द्यायचे, या संभ्रमात खाण अवलंबित आहेत. एक मात्र खरे, खाणी सुरू करण्याच्या बाता प्रत्येकजण मारत आहेत, हे मतदारांनाही आता चांगलेच ठाऊक झाले आहे. ∙∙∙

पुतळ्याचे उजळले भाग्य

निवडणुकीच्या काळात कुणाचे भाग्य उजळणार आणि कुणाचे काळे पडणार हे सांगता येत नाही. आता हेच बघा ना, मडगाव (Margao) - पणजी (Panjim) हमरस्त्यावर नुवेत एक टायरांचे दुकान आहे. त्या दुकानासमोर दुकानाची वाट दाखविणारा एक पुतळा आहे. तसा हा पुतळा सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतोच, पण आता निवडणुकीच्या काळात या मतदारसंघातील उमेदवार हा पुतळा म्हणजे एक ऐतिहासिक स्मारक असल्याप्रमाणे त्याच्या जवळ उभे राहून स्वतःचे फोटो काढून घेत आहेत. काल शनिवारी तृणमूलचे उमेदवार राजू काब्राल यांनाही हा मोह आवरला नाही. निवडणूक झाल्यानंतर निवडून आलेल्या उमेदवाराने हा पुतळा खरोखरच स्मारक म्हणून नोंद केली नाही म्हणजे मिळविली. ∙∙∙

गरिबांचा कळवळा

सध्या राज्यातील गरिबांचा सर्वच राजकीय पक्षांना कळवळा येऊ लागला आहे. दिल्ली येथून येणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कोलकात्याहून येणाऱ्या ममता दीदी यांनी राज्यातील गरिबांसाठी पोटली उघडी केली आहे. कोण वीज मोफत देतो, तर कोण महिलांना दरमहा आर्थिक साहाय्य देण्याचे आश्वासन देऊन मोकळे झाले. मात्र अद्याप गरीब गोवेकरांच्या झोळीत काहीच पडलेले नाही. ‘एक दिता म्हळा, एक दिवचे केला’ असाच प्रकार सुरू आहे. मात्र, कॉंग्रेसचे राहुल गांधी यांनी राज्यात येऊन ‘हम भी कुछ कम नही’ या थाटात गरीब कुटुंबांना दरमहा सहा हजार व प्रतिवर्षी ७२ हजार रुपयांची आर्थिक मदतीची योजना जाहीर करून सर्वांवर कुरघोडी केली आहे. आता ही योजना सत्यात उतरणार का? की अन्य आश्‍वासनांप्रमाणेच हवेत विरणार, अशी चर्चा सुरू आहे. ∙∙∙

कोविडचे निर्बंध फायदेशीर

कोविडचा संसर्ग वाढत चालल्याने निवडणूक आयोगाने जाहीर प्रचारावर घातलेले निर्बंध अन्य कुणाला नसले तरी उमेदवारांसाठी खरेच लाभदायक ठरले आहेत. यापूर्वी केवळ या प्रचारासाठी त्यांना प्रचंड खर्च करावा लागत होताच शिवायबरोबर फिरणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांच्या पोटा-पाण्याची व्यवस्था करावी लागत होती. त्याशिवाय रोजचा मोबदलाही द्यावा लागत होता. पण आता उमेदवारांसोबत जाणाऱ्यांच्या संख्येवरील मर्यादा तसेच रोड शो, मिरवणुकांवरील बंदी यामुळे हा सगळा खर्च वाचला आहे. या कारणावरून राष्ट्रीय पक्षांनी निवडणूक निधी कमी केला नाही म्हणजे मिळवले.∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT