घराणेशाहीला तडीपार करा: स्मृती इराणी

स्मृती इराणी : गोमंतकीयांपुढे भाजप हा मोठा पर्याय
Union Minister Smriti Irani
Union Minister Smriti IraniDainik Gomantak
Published on
Updated on

कुंकळळी: काँग्रेस पक्ष योग्यता, लोकशाही, परीश्रम, लोकमान्यता, त्याग व कष्ट याच्यांपेक्षा राजेशाहीला मान्यता देत असून गोमतकीयांना जर प्रतिभा, योग्यता, लोकशाही व परिश्रमास मान द्यायचा असेल तर भाजपा हाच पर्याय आहे. गोमतकीयांनी भाजपाची सत्ता पुन्हा एकदा स्थापित करून घराणेशाही व राजेशाहीला तडीपार करून लोकशाही मजबूत करावी, असे आवहान केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी कुंकळळी मतदारसंघातील (Cuncolim Constituency) गिरदोली येथे भाजपाच्या प्रचार सभेत बोलताना केले. यावेळी कुंकळळीचे आमदार व भाजपाचे उमेदवार क्लाफास डायस, महाराष्ट्राचे माजी आमदार योगेश सागर, कर्नाटकाचे भाजपा नेते राजू, मंडळ अध्यक्ष मारुती देसाई, गिरदोली, परोडा, गिरदोली, चांदरा, आंबावली व कुंकळळी पालिका क्षेत्रातील पंचायत क्षेत्रातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.(smriti iranis statment on goa politics)

Union Minister Smriti Irani
Goa Election 2022: सर्वाधिक गुन्हे नोंद असलेले उमेदवार हे काँग्रेसच्या गोटात!

केंद्राच्या ‘हर घर मे नल’ योजने अंतरंग गोव्यात भाजपा (Goa BJP) सरकारने दोन लाख साथ हजार लोकांना नळ जोडण्या दिल्या आहेत. एक लाख तीस हजार शौचालय उभारले, एक हजार सहाशे विक्रेत्यांना खास योजने अंतर्गत अडीच कोटी रुपयांचे अनुदान दिले. कोविड काळात राज्य सरकारने 19 महिन्यात एक लाख चाळीस हजार कुटुंबांना मोफत रेशन वाटले. ज्या वेळी देश संकटात होता तेव्हा काँग्रेसचे नेते आपल्या नानी कडे सुटी घालवीत होते व लसीवर शंका उपस्थित करीत होते, असाही आरोप इराणी (Smriti Irani) यांनी केला.

आमदार क्लाफासीयो डायस म्हणाले, मी काँग्रेसमध्ये असतो तर मतदारसघ उपेक्षित राहिला असता. आपण भाजपात प्रवेश केल्यामुळेच आपल्या मतदार संघाचा विकास करणे शक्य झाले. अडीच वर्षात शंभर कोटी रुपयांची विकासकामे केली असून गेल्या निवडणुकीत आपल्या सोबत असलेले नव्वद टक्के ख्रिस्ती व मुस्लिम मतदार यावेळी आपल्या सोबत आहेत.

अशा नेत्यांवर विश्वास कसा ठेवायचा?

काँग्रेस (Goa Congress) पक्षाला लाज लज्जा आणि शरम नावाची गोष्ट माहित नसून या पक्षाचे नेते गोव्यात येऊन आपल्याच उमेदवाराकडे पक्ष सोडणार नसल्याची शपथ घेऊन शपथेवर प्रतिज्ञापत्र सादर करायला लावतात. ज्या पक्षाच्या नेत्याला स्वताच्याच कार्यकर्त्यांवर व नेत्यावर विश्वास नाही. त्या पक्षावर जनता कसा विश्वास ठेवणार असा प्रश्न इराणी यांनी यावेळी विचारला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com