Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा निवडणूक

निकालापूर्वीच मंत्रिपदे जाहीर! खरी कुजबूज..

तरी बरे भाजपने खातेवाटप जाहीर केलेले नाही.

दैनिक गोमन्तक

निकालापूर्वीच मंत्रिपदे!

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची गाडी सध्या सुपरफास्ट धावू लागली आहे. मतदानाला अजून काही दिवस आहेत. त्यानंतर मतमोजणी होऊन निकाल जाहीर व्हावयाचे आहेत, पण आमचे दोतोर थोढेही थांबण्यास तयार नाहीत. भाजपच सरकार स्थापणार असे गृहीत धरून ते उपमुख्यमंत्री तसेच मंत्री कोण होणार ते सांगून मोकळे होताना दिसत आहेत. एकप्रकारे शितापुढे मीठ खाण्याचाच हा प्रकार असल्याची चर्चा आता भाजप गोटात सुरू झाली आहे. तरी बरे त्यांनी खातेवाटप जाहीर केलेले नाही. खरे तर भाजप असो वा काँग्रेस त्यांचे मुख्यमंत्री व मंत्रीच केवळ नव्हे, तर खातेवाटपसुध्दा दिल्लीत ठरत असते बरे का! नाहीतरी दिल्ली कशी निर्णय घेते हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी काही दिवसांपूर्वी इंडिया टुडेच्या राउंड टेबल मीट मध्ये सांगितले आहेच ना! ∙∙∙

लोकप्रिय डॉक्टर निवडणुकीत

शिरोडा मतदारसंघात असा एक लोकप्रिय उमेदवार आहे की तो आपल्या प्रतिस्पर्ध्याबद्दल एकही वाईट शब्द उच्चारत नाही की कोणालाच कमी मानत नाही. लोकांच्या आग्रहावरून आपण निवडणुकीत उभा आहे. आता या डॉक्टर उमेदवाराला पुढे काढणारे किती जण मते देतील ते त्यांचे त्यांनाच ठाऊक, परंतु काही राजकीय पक्षाच्या बड्या नेत्यांना त्याच्या काही गावातील कार्यकर्त्यांनी ठासून सांगितले आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत, परंतु डॉक्टर प्रचारासाठी आपल्या भागात आले तर मात्र त्यांच्याबरोबर आम्ही फिरणार आहोत. खुद्द मगोचे नेते सुदिन ढवळीकर हेसुध्दा या प्रामाणिक, निष्कलंक डॉ. सुभाष प्रभुदेसाईंची उदाहरणे देतात म्हणे. आता राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. सुभाष प्रभुदेसाई यांना लोक किती मते देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ∙∙∙(Political gossip about cm Pramod Sawant regarding Goa Election 2022)

कोटीच्या-कोटी उड्डाणे

निवडणुकीच्या प्रचारात सर्व नेते मंडळी गुंग झाल्या आहेत. आता एका संस्थेने जो अहवाल जाहीर केला आहे, त्यात 10 कोटींपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या उमेदवारांची संख्या वीस आहे, तर एकूण उमेदवारांपैकी 62 टक्के उमेदवार हे कोट्यधीश आहेत. मात्र, या उमेदवारांची खरी कोटीच्या कोटी उड्डाणे वेगळीच असण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकारण हे आताच्या स्थितीत समाजकारण राहिलेले दिसत नाही. अनेक नेते बक्कळ पैसा कमविण्याच्या इराद्याने राजकारणात आपले नशिब आजमावतात. गेल्या विधानसभा निवडणुकीत 6 उमेदवार 10 कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असलले उमेदवार होते. विशेष म्हणजे ते सर्वजण निवडणकीत जिंकून आले होते. आता कोटीच्या कोटी उड्डाणे करणारे उमेदवार यंदाची विधानसभा निवडणूक कितीजण जिंकतात हे पाहावे लागेल. ∙∙∙

त्याने परत टोपी फिरवली!

प्रत्येक निवडणुकीत टोपी फिरविण्यात माहीर असलेल्या सावर्डे मतदारसंघातील (Sanvordem Constituency) एका राजकारण्याने पुन्हा एकदा टोपी फिरवत अपक्ष उमेदवाराला आपला पाठिंबा दिला आहे. पूर्वी हा राजकारणी भाजपबरोबर होता, मग तो मगोत गेला, एका रात्रीत मगोचे सावर्डे भाजपचे झाल्यावर तोही भाजपवासी झाला. पैशांसाठी स्वतःला विकणारे अनेक राजकारणी पाहायला मिळतात. हा नामवंत राजकारणी त्यापैकीच एक. आपला स्वाभिमान गहाण ठेवून एका अपक्षाच्या दावणीला बांधला गेलेला बैल हा सर्व परिचित राजकारणी असून आज त्याने आपला विश्वास गमावलेला आहे अशा राजकारण्यांपासून सावर्डेवासीयांनी सावध राहण्याची गरज आहे असे त्याचेच समर्थक आता म्हणू लागले आहेत. ∙∙∙

पैसा फेको तमाशा देखो!

‘एकाने दुसऱ्यास गिळावे, दुसऱ्याने तिसऱ्यास... हाच जगाचा न्याय खरा हीच जगाची परंपरा...’ या विधानाचा खरा अर्थ आपण राजकारण्यांकडून चांगला शिकू शकतो. राजकारणी, आमदार, मंत्री व नेत्यांना भ्रष्टाचारी, चोर, लुटेरे अशी विशेषणे लावून आपण आम जनता मतदार राजकारण्यांवर टीकेची झोड उठवतो. सगळे खोटारडे, फटींग म्हणून बेंबीच्या देटापासून ओरडतात. मात्र, आपण कुठे धुतल्या तांदळासारखे शुद्ध आहोत? सध्या एका मताची किंमत पाच हजार रुपये झाली आहे. राजकारणी आपल्या जाहीरनाम्याच्या प्रती बरोबर गांधीजींची प्रतिमा असलेल्या नोटा वाटत फिरत आहे. हे सगळे स्वतःला शुद्ध व पवित्र म्हणविणारे मतदार उघड्या डोळ्यांनी पाहात आहोत. मिळाले तर सोडावे का? म्हणत मोठमोठी प्रवचन देणारेही नोटा स्वीकारीत आहेत. सगळ्यांना सत्यवान हवेत. मात्र, आपल्या घरी नकोत, शेजारच्या घरात हवेत. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे या काव्यपंक्तीचा आपण भलताच अर्थ घेतला असावा. ∙∙∙

तो मी नव्हे..!

कुंकळ्ळी मतदारसंघात आपचे उमेदवार प्रशांत नाईक आहेत, तर गोवा फॉरवर्डचे प्रशांत मुकुंद नाईक यांनी पक्षाचे काणकोणमधील युतीचे उमेदवार जनार्दन भंडारी यांना समर्थन देऊन प्रचार कार्यात झोकून दिले आहे. मात्र, एका वर्तमानपत्रात कुंकळ्ळीच्या आपच्या उमेदवाराच्या जागी गोवा फॉरवर्डचे प्रशांत मुकुंद नाईक यांचा फोटो छापून आल्याने चर्चा सुरू झाली. गोवा फॉरवर्डचे प्रशांत नाईक यांनी लागलीच सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून तो मी नव्हे हे सांगून चर्चेवर पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. ∙∙∙

कुंभारजुवेत मतविभागणीचा फटका

कुंभारजुवेत (Cumbarjua) भाजपतर्फे अनेक इच्छुक उमेदवार होते, त्यामुळे यादी उशिरा जाहीर झाली. त्यात जेनिता मडकईकरांना लॉटरी लागली. सिद्धेश नाईक, रोहन हरमलकर बाजूला पडले. त्यापैकी सिद्धेशची नाराजी दूर झाली, पण रोहनने बंड केले, शिवाय कॉंग्रेसचे समील वळवईकर यांनी तृणमूलमध्ये दाखल होऊन उमेदवारी मिळवली. त्यामुळे काँग्रेसच्या राजेश फळदेसाई यांनाही धक्काच दिला. त्यामुळे कॉंग्रेस, भाजपातील बंडाळी व इतर उमेदवारांच्या गर्दीत मतांची विभागाणी कोणाला फटका तर कोणाला फायदाही होईल. दिवाडी, कुंभारजुवे, करमळी पट्ट्यातील मतांवरच विजेता ठरणार आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT