Goa Assembly Eletions
Goa Assembly Eletions Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Assembly Eletions: ह्या निवडणुकीत जनता आम्हालाच जिंकून देईल: मुख्यमंत्री

दैनिक गोमन्तक

Goa Assembly Eletions: 'भाजप पक्ष निवडणुकीसाठी सज्ज आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने घालून दिलेली मार्गदर्शक तत्वे आणि निर्बंधाचे भाजप (BJP) काटेकोरपणे पालन करेल', अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी दिली. तसेच राज्यात आचारसंहिता (Social Code of Conduct) लागू झाल्याने नोकरभरती प्रक्रिया आहे त्या स्थितीत स्थगित झाल्याचे त्यांनी सांगितले. भाजपच्या निवडणूक कार्यालयात पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanawade), नरेंद्र सावईकर उपस्थित होते.

सावंत म्हणाले, गेल्या दहा वर्षांमध्ये भाजपने केलेला राज्याचा विकास उल्लेखनीय आहे. गेल्या दोन वर्ष दहा महिन्यांमध्ये गोव्याची सेवा करण्याची संधी मला मिळाली. या काळात सरकारतर्फे अंतोदय पद्धतीने समाजातल्या खालच्या थरापर्यंत सरकारच्या योजना पोचवून त्यांना लाभ देण्यासाठी सरकारचे प्रयत्न राहिले. सरकारने साधनसुविधा उभारण्याबरोबर मानवी विकासावर भर दिला आहे. जनतेच्या सांस्कृतिक कल्याणासाठी अनेक योजना कार्यरत असून दयानंद सामाजिक सुरक्षा, गृह आधार, लाडली लक्ष्मी, यासारख्या सामाजिक योजनांबरोबरच (Goa Government schemes) कोविडच्या काळात आर्थिक महसूल कमी झाला असतानाही ही नागरिकांना चांगल्या आरोग्याच्या सेवा देण्यामध्ये सरकार यशस्वी झाले आहे. या आधारावर राज्यातील जनता पुन्हा भाजपला स्वबळावर येणारी विधानसभा निवडणूक (Goa Assembly Elections 2022) जिंकून देईल.

राज्यात विरोधक एकत्र आघाडी करण्याचा प्रयत्नात आहेत. मात्र, त्यांची आघाडी ही सत्तेसाठी आहे. सरकारची विकासकामे लोकांच्या पसंतीला पडली असून विरोधकांनी एकत्रित निवडणूक लढवली तरीही त्याचा भाजपच्या कोणताही परिणाम होणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: 25 लाखांची सोन्याची बिस्किटे घेवून झाला फरार; पश्चिम बंगालमधून चोरट्याला अटक!

IndiGo Future Plan: इंडिगोचा मेगा प्लॅन, 100 छोटी विमाने ऑर्डर करण्याची एअरलाइन्सची तयारी

Dhargal Hit And Run Case: धारगळमध्ये तो अपघात नव्हे खूनच! उत्तर प्रदेशच्या दोघांना अटक

Lost From Beach: गोव्यात विविध बीचवरुन पाच मुले बेपत्ता; 'दृष्टी'ने घडवली कुटुंबियांशी पुन्हा भेट

Margao Session Court: वेश्याव्यवसायासाठी महिलांची खरेदी आणि पुरवठा केल्याप्रकरणी एकजण दोषी

SCROLL FOR NEXT