साखळी येथील कॉग्रेस सभा  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोव्यात भाजपला सत्तेवरुन खाली खेचणार..!

कार्यकर्त्यांनी एकजूटीने प्रचारात सहभाग घ्यावा. साखळी येथील कॉग्रेस सभेत पी.चिदंबरम यांचे आवाहन..!

दैनिक गोमन्तक

साखळी: भाजप (BJP) सरकारने पुन्हा एकदा जनतेचा अपेक्षाभंगच केला असून मागच्या निवडणूकीप्रमाणे (Election) या खेपेसही मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांचा पराभव करुन भाजपला घरी पाठवण्यासाठी गोव्यातील जनता सज्ज झाली आहे. त्यासाठी मतभेद विसरुन कॉग्रेस कार्यकर्त्यांनी एकजूटपणे प्रचारात भाग घ्यावा असे आवाहन कॉग्रेसचे राष्ट्रीय नेते माजी केंद्रीय मंत्री तथा गोव्यातील कॉग्रेस प्रभारी पी.चिदंंबरम यांनी केले.

साखळी मतदार संघातील कॉग्रेस कार्यकर्त्यांची सभा साखळी येथे "ला तारा" येथे बोलावण्यात आली होती. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चिदंबरम बोलत होते.

यावेळी व्यासपिठावर उत्तर गोवा कॉग्रेस (congress) अध्यक्ष विजाय भिके, माजी मंत्री सदानंद मळीक, माजी आमदार प्रताप गावस, साखळी गट कॉग्रेसचे अध्यक्ष मंगलदास नाईक, प्रदेश कॉग्रेस सदस्य खेमलो सावंत, उत्तर जिल्हा कॉग्रेस सचीव अनंत पिसुर्लेकर, साखळीचे नगराध्यक्ष राया पार्सेकर, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक धर्मेश सगलानी, माजी नगराध्यक्ष सुनीता वेरेकर,माजी जिल्हा पंचायत सदस्य लक्ष्मीकांत परब, माजी सरपंच प्रविण ब्लेगन, रेणूका देसाई, महादेव खांडेकर, निळकंठ गावस, सुर्याकांत गावडे आदींची उपस्थिती होती.

साखळी येथील कॉग्रेस सभेला उपस्थित जनसमुदाय

गोव्यातील जनतेने मागच्या निवडणूकीतच भाजप सरकारच्या मुख्यमंत्र्यांसह (CM) अनेक मंत्र्यांना पराभवाचा हिसका दाखवून भाजप सरकारला घरी पाठवले होते.परंतु पैशांचे आमिष दाखवून कॉग्रेसच्या आमदारांना फोडून भाजपने मागच्या दरवाज्याने बेकायदेशीर जनतेच्या कौलाविरुध्द सरकार बनवले. जनता याचा बदला या निवडणूकीत घेणार आहे. कार्यकर्त्यांनी सुचविलेला उमेदवारच कॉग्रेस निवडील. उमेदवार स्थानिकच असेल बाहेरुन लादला जाणार नाही. कोळसा प्रदुषण प्रकरण, धोकादायक प्रकल्प, महिला समस्या, गुन्हेगार प्रकरणे आदी विषयी कॉग्रेस जाहीरनामा तयार करील. हा मतदार संघ मुख्यमंत्र्यांचा. मुख्यमंत्री अनेक राज्यामध्ये पराभूत झाले आहेत. गोव्यातही मागच्या वेळी मुख्यमंत्री पराभूत झालेले आहे.यंदाही दुसऱ्यांदा इतिहास घडवा. खाण व्यवसाय गोव्याचा मुख्य व्यवसाय आहे तो कायदेशीररित्या पुन्हा सुरु करण्याचे आश्वासन दिले. सुशिक्षित तरुण नोकरीसाठी गोव्याबाहेर जातात.? कॉग्रेस सरकारामध्ये ही परिस्थिती येणार नाही यासाठी विशेष योजना बनविण्यात येईल.असे चिदंबरम म्हणाले.

यावेळी बोलताना माजी आमदार (MLA) गुरुदास गावस (Gurudas Gavas) म्हणाले हा मतदार संघ मगोचा बालेकिल्ला होता. स्व.गुरुदास गावस यांनी कॉग्रेसचे कार्य वाढवले. आपण आमदार असताना फुकट नोकऱ्या दिल्या.आज नोकऱ्या विकल्या जात आहे. विज, पाण्याची समस्या सुटल्याच नाहीत उलट बिले मात्र वाढवली. मुख्यमंत्री असूनही प्रमोद सावंत साखळीच्या समस्या सोडविण्यास अपयशी ठरला आहे असा आरोप केला. साखळीचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक धर्मेश सगलानी म्हणाले आज सर्वात भ्रष्टाचारी म्हणून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची नोंद झाली आहे. हे सरकार केवळ दलाली करीत आहे.

साखळी पालिकेचे नगरसेवक राजेश सावळ यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह कॉग्रेसमध्ये प्रवेश केला(चंद्रशेखर देसाई)

कॉग्रेस गेली दहा वर्षे सत्तेत व प्रमोद सावंत आमदार, सभापती, मुख्यमंत्री बनले पण साखळी पालिकेवर झेंडा हा कॉग्रेसचाच आपण ठेवण्यास यश मिळवले.आम्ही घाबरत नाहीत हे आम्ही सत्ताधारींना दाखवून दिले आहे साखळी पालिकेत. गेल्या विधानसभा निवडणूकीत आपल्याला कॉग्रेस उमेदवार म्हणून फक्त 13 दिवस मिळाले. तरीही थोडक्यात माझा पराभव झाला. लोकांना भाजप सरकार सुडाचा दबाव आणत आहेत म्हणून लोक आचारसंहिता लागू झाल्यानंतर भाजप विरोधात घराबाहेर पडणार.

सरकारच्या योजना (Government schemes) बंद करु अशा धमक्या दिल्या जात आहे.भाजप आपल्या पार्टी फंड मधून पैसा देत नाही. मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावे "भिवपाची गरज लोकांना अजिबात नाही" पण भिवपाची गरज मुख्यमंत्री व भाजप सरकारला आहे.माजी जिल्हा पंचायत सदस्य लक्ष्मीकांत परब म्हणाले प्रत्येक बुथवर 300 मते म्हणजेच 15 हजार मते मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी अनंत पिसुर्लेकर, खेमलो सावंत, सुनिता वेरेकर, प्रविण ब्लेगन, सदानंद मळीक, महादेव खांडेकर, रेणूका देसाई, सुर्याकांत गावडे यांनीही विचार मांडले.

यावेळी साखळी पालिकेचे उपनगराध्यक्ष राजेश सावळ यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह कॉग्रेसमध्ये रितसर प्रवेश केला.या सभेला कॉग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन उत्साह दाखवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT