Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा निवडणूक

जनतेला आता भाजप सरकार नकोय; गोवेकर कॉंग्रेसलाच निवडून देणार: दिगंबर कामत

मी यंदाच्या निवडणुकीत तब्बल 500 मतांनी पुढे असेन; कामत यांचे वक्तव्य

दैनिक गोमन्तक

गोवा: विधानसभा निवडणुकीचे मतदान आज पार पडले, आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरवात झाली होती. गोवा विधानसभा निवडणुकीला गोवेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, नवमतदारांसोबतच ज्येष्ठ नागरिकही घराबाहेर पडून मतदान करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध स्तरातून राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. यातच विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी गोमंतकशी बोलताना आपले मत स्पष्ट केले. (People do not want BJP government; goans to elect Congress Digambar Kamat)

मडगावकरांच्या आशीर्वादाने आत्तापर्यंत मी निवडणूक बहूमतांनी जिंकून आलो आहे. या निवडणुकीत देखील मला मडगावकर जिंकून देखील, याची मला पूर्ण खात्री आहे. आम्ही जनतेला सतत सांगत असतो की गोवेकरांच्या हाती भविष्य असून आता फक्त कॉंग्रेस सरकारलाच निवडून द्या. जनतेला आता भाजप सरकार नको आहे. लोकांना आता सरकार बदलायचे असून, जास्तीत जास्त जनता ही काँग्रेसलाच मत देईल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली आहे. ते पुढे म्हणाले, घरोघरी प्रचारादरम्यान मला जो लोकांकडून प्रतिसाद मिळाला तो इतका सकारात्मक होता की ज्या कोंबात मी मागच्या निवडणुकीत 400 मतांनी मागे होतो त्याच कोंबात मी यंदाच्या निवडणुकीत तब्बल 500 मतांनी पुढे असेन आणि यात आश्चर्यकारक असे काहीच नाही

"2017 ला पार्सेकरांना जनतेने तब्बल सात हजार मतांनी मागे टाकलं; यावरून हेच लक्षात येतं की, जनतेने मनावर घेतलं तर तुमचं सरकार ते पाडू देखील शकतात, जिंकण्यासाठी तुम्ही कितीही पैसे वाटा, एकदा जनतेने ठरवलं तर तुमचे सगळे प्रयत्न अपयशी ठरतील असा जहरी टोला त्यांनी विरोधी पक्षाला लगावला. विरोधी पक्षातील नेत्यांनी दिगंबर कामतने काय केले असे विचारत घरोघरी प्रचार केला. मात्र त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, दिगंबर कामतने जनतेचा विश्वासघात केला अशी आजपर्यंत मडगाव मध्ये चर्चा नाही, मी स्वच्छ चारित्र्याचा असून माझे काम जनतेसमोर उघड आहे." असे ते म्हणाले.

दरम्यान त्यांना कॉंग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाबाबत विचारले असता, मुख्यमंत्री होणं माझं स्वप्न नाही मला केवळ जनतेची सेवा करायची आहे. मी मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही निर्णय सांगू शकत नाही कारण, काँग्रेसचे मुख्यमंत्रीपद हे केवळ काँग्रेस प्रमुख नेत्यांकडून ठरवण्यात येते, असे ते म्हणाले.

यावर्षी 90% मतदान होईल असा अंदाज निवडणूक आयोगातर्फे वर्तवण्यात आला आहे. मतदान केंद्रांवर लोक मतदानासाठी गर्दी करत आहेत. आज गोव्यात सकाळी 7 ते 5 वाजेपर्यंत एकूण 75.29% मतदान पार पडले आहे. त्यापैकी उत्तर गोव्यात (North Goa) 75.33% तर दक्षिण गोव्यात (South Goa) 75.26% मतदान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT