गोवा: विधानसभा निवडणुका आज पार पडणार आसून, राज्यात आज सकाळपासून मतदानाला सुरवात झाली आहे. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. राज्यात आज होणाऱ्या मतदानावर राज्यातील अनेक स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या बड्या नेत्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Political leaders apele to people vote for goa assembly election 2022 through Twitter)
संपूर्ण उत्तराखंड, गोवा (Goa) आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात मतदान होणार आहे. आज जे मतदान करण्यास पात्र आहेत त्यांना मी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आणि लोकशाहीचा सण बळकट करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले.
आज माझ्या सर्व गोव्यातील मित्रांनो, विकास निवडा असे म्हणत, प्रियंका गांधा (Priyanka Gandhi) यांनी गोव्यातील जनतेला मतदान करण्याचे आवाहन ट्वीटरच्या माध्यमातून केले.
"प्रिय गोवेकरांनो, ही भ्रष्ट व्यवस्था बदलून गोवा भ्रष्टाचारमुक्त करण्याची ताकद तुमच्यात आहे. कृपया आज बाहेर पडा आणि तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी मतदान करा." असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी केले.
पी चिदंबरम यांनी काल ट्विटरच्या माध्यमातून काल जनतेशी संवाद साधला दरम्यान ते म्हणाले "गोव्यात 14 रोजी मतदान होणार आहे. माझा गोव्यातील लोकांच्या चांगुलपणावर तसेच, लोकांना विकास, नोकऱ्या आणि सुरक्षा देणारे चांगले सरकार निवडून आणण्याच्या त्यांच्या इच्छेवर प्रचंड विश्वास आहे." असे ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.