Goa TMC Twitter/ AITC Goa
गोवा निवडणूक

TMC: गोव्यात भाजपसमोर विरोधकांची मोट!

कॉंग्रेसचे आग्नेल फर्नांडिस (Agnel Fernandes), जोजफ सिक्वेरा आणि अँथनी मिनेझिस यांचा तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश.

दैनिक गोमन्तक

TMC: गोव्यातील राजकीय घडामोडींमुळे गोवा नेहमीच चर्चेत असतो. मागील 5 वर्षात गोव्यातील तब्बल 24 आमदारांनी पक्षांतर केले आहे. यातच माजी मंत्री मायकल लोबो यांना कॉंग्रेसमध्ये प्रवेश स्वीकारल्यामुळे कळंगुट काँग्रेस समितीचे (Calangute Congress Committee) सदस्य आग्नेल फर्नांडिस (Agnel Fernandes), जोजफ सिक्वेरा आणि अँथनी मिनेझिस यांनी आपली नाराजी स्पष्ट दर्शवली होती.

त्यांनी कॉंग्रेसविरुद्ध एकत्र लढा देण्याचे निश्चित केले होते. एकंदरीतच कॉंग्रेसला हरवण्यासाठी ते काहीही करू शकतात अशी चर्चा सुरू असतानाच, या तिघांच्याही तृणमूल कॉँग्रेसमध्ये (Trinamool Congres goa) पक्षप्रवेशाची बातमी समोर येत आहे. गोवा तृणमूल कॉंग्रेसच्या प्रभारी आणि टीएमसी खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) आणि आमदार चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) यांच्या उपस्थितीत आग्नेल फर्नांडिस, जोजफ सिक्वेरा आणि अँथनी मिनेझिस यांनी इतर 300 जणांसोबत टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे.

महुआ मोईत्रा यांच्या म्हणण्याप्रमाणे भाजपला पराभूत करण्यासाठी इतर भाजप विरोधी पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. त्यात त्यांना या पक्षांतरचा लाभ मिळत असलेला लाभ निवडणुकीवेळी नक्की दिसून येईल, असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे गोवा विधानसभा निवडणूक (Goa Assembly Elections 2022) तोंडावर असूनही गोव्याच्या राजकारणात सुरू असलेले पक्षांतर कधी थांबणार? हा चर्चेचा मुद्दा बनला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT