NCP Mla Churchill Alemao will join TMC today  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

चर्चिल आलेमाव यांचा आज तृणमूलमध्ये प्रवेश

आज दुपारी 3 वाजता बाणावली येथील दांडो मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेला तृणमूलच्या राष्ट्रीय अध्यक्ष ममता बॅनर्जी उपस्थित राहणार आहेत.

दैनिक गोमन्तक

आतापर्यंत तृणमूल पक्षात (Trinamool Congress) सामील होण्याचा निर्णय सतत लांबणीवर टाकणारे बाणावलीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) आमदार चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) हे, सोमवारी कन्या वालंका आलेमाव हिच्यासह तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, असे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत असले तरी काय होणार, हे उद्याच कळेल असे वक्तव्य करून आलेमाव यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे.(NCP Mla Churchill Alemao will join TMC today)

आज दुपारी 3 वाजता बाणावली येथील दांडो मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेला तृणमूलच्या राष्ट्रीय अध्यक्ष ममता बॅनर्जी उपस्थित राहणार आहेत. मात्र, यावेळी केवळ चर्चिल तृणमूलमध्ये प्रवेश करतील, की राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विधिमंडळ पक्षच तृणमूलमध्ये विसर्जित करतील, हे सभेवेळी स्पष्ट होणार आहे. चर्चिल हे राष्ट्रवादीचे एकमेव आमदार असल्याने आमदारकीचा राजीनामा न देताही ते तृणमूलमध्ये प्रवेश करू शकतात. मात्र, त्यांना विधिमंडळ पक्ष तृणमूलमध्ये विसर्जित करावा लागेल.

सभेला उपस्थित राहा, माझा निर्णय कळेल

सोमवारच्या या सभेबद्दल आलेमाव यांना विचारले असता, तुम्ही उद्या सभेला उपस्थित राहा. माझा निर्णय काय तो तुम्हाला तिथेच कळेल. मी उद्या महत्त्वाची घोषणा करणार आहे, एवढेच ते म्हणाले.

दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) देखील गोव्यात दाखल झाल्या आहेत. दाबोळी विमानतळावर त्यांचे कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केले. त्या 13 व 14 रोजी गोव्यातील वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत .

बॅनर्जी या 13 रोजी बाणावली तर 14 रोजी पणजी व अस्नोडा येथे जाहीर सभा घेणार आहेत. बाणावलीच्या सभेत आलेमाव पिता-पुत्रीला तृणमूलमध्ये प्रवेश देण्याची शक्यता आहे. तृणमूलशी युती करण्याचा निर्णय मगोने घेतल्यानंतर त्याची घोषणा बॅनर्जी या सभेत करण्याची शक्यता आहे. यावेळी युतीचा मुख्यमंत्रीही जाहीर होऊ शकतो. मगोचे सुदिन ढवळीकर हे त्यासाठी दावेदार असू शकतात, अशीही चर्चा आहे. बॅनर्जी तसेच मगोच्या पदाधिकाऱ्यांशी आगामी निवडणुकीत मगोने निश्‍चित केलेल्या 12 जागांबाबतही निर्णय होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT