<div class="paragraphs"><p>Modi indirectly appealed to the people of Goa to vote on occasion of liberation day</p></div>

Modi indirectly appealed to the people of Goa to vote on occasion of liberation day

 

twitter/@ani

गोवा निवडणूक

पोप फ्रान्सिस ते गोवेकरांचे कौतूक; मोदींचे मतदानासाठी अप्रत्यक्ष आवाहन

दैनिक गोमन्तक

पणजी: हीरकमहोत्सवी गोवा मुक्तिदिनाच्या (Goa Liberation Day) समारोप समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी हजेरी लावत एका भेटीत अनेक उद्देश साध्य केले आहेत. हा सभारंभ पूर्णतः शासकीय स्वरूपाचा होता. त्यामुळे पंतप्रधानांनी राजकीय भाष्य टाळत विरोधकांना चकवा दिला असला, तरी त्यांना द्यावयाचा संदेश अत्यंत खोचक पद्धतीने देत कार्यकर्ते आणि सामान्य जनतेपर्यंत पोचवला. पंतप्रधानांचे हे भाषण अत्यंत समग्र, व्यापक, सर्वसमावेशक आणि प्रगल्भ असेच होते.

विविध प्रकारच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने केलेल्या कामाचे पंतप्रधानांनी तोंड भरून कौतुक केले. मुख्यमंत्र्यांच्या (CM Pramod Sawant) भाषणानंतर अक्षरशः पंतप्रधानांनी त्यांची पाठ थोपटली. यावरून येत्या विधानसभेच्या निवडणुका (Goa ELection) या डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली होतील हे स्पष्ट झाले. राज्य सरकारचे काम अत्यंत चोख पद्धतीने सुरू असल्याचे सांगताना दीर्घकालीन विकासासाठी सातत्य आणि स्थैर्याची गरज असते असे सांगत नागरिकांना भाजपला (BJP) मतदान करा असे पंतप्रधानांनी अप्रत्यक्षरित्या सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची ही सभा आणि संदेश भाजप कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याबरोबर भाजपच्या शिडात हवा भरणारा मानावा लागेल. भाजपने या चालून आलेल्या कार्यक्रमाचा अत्यंत खुबीने वापर केला. कार्यक्रमात सत्ताधारी पक्षाचे नेते उपस्थित होते. मात्र, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे कार्यक्रम शासनाचा मात्र, गवगवा भाजपचा अशीच काहीसी स्थिती होती.

सर्वत्र भाजपचे झेंडे आणि फलक...

प्रत्यक्ष सभागृहामध्ये भाजपचे चिन्ह किंवा झेंडे नसले तरी सभागृहाच्या बाहेर सर्वत्र भाजपचे झेंडे फडकत होते. सभागृहाबाहेर अनेक ठिकाणी मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रतिमा दिसत होत्या. यावरून हा कार्यक्रम पूर्णतः भाजपने ‘हायजॅक’ केल्याचे स्पष्ट दिसत होते. यासाठी भाजपने मोठे कष्ट घेतल्याचीही चर्चा होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT