Michael Lobo and delilah lobo Dainik Gomantak
गोवा निवडणूक

लोबो दाम्पत्य जिंकूनही सत्तेपासून राहणार दूरच

लोबो दाम्पत्य जिंकूनही काँग्रेसचे सत्तास्थापनेचे स्वप्न मात्र अधुरे

दैनिक गोमन्तक

कळंगुट : ‘टुगेदर फॉर बार्देश’चा नारा देत काँग्रेसच्या विजयाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन काम करणारे कळंगुटचे उमेदवार तथा माजी मंत्री मायकल लोबो यांचे वारु अखेर बार्देशातील चारच जागांवर अडकून पडल्याने काँग्रेसचे सत्तास्थापनेचे स्वप्न भंगले आहे. राज्याच्या उर्वरीत भागातही मतदारांनी कॉंग्रेसला नाकारल्याने राज्यात काँग्रेसचे सरकार घडविण्याचे स्वप्न अधुरेच राहिल्याचे चित्र आहे.

शिवोलीतून कॉंग्रेसच्या (Congress) तिकीटावर दिलायला लोबो यांना निवडून आणण्यात इतिहास घडविण्यात लोबो यशस्वी ठरले आहेत. शिवोलीचे माजी आमदार तसेच मंत्री राहिलेल्या विनोद पालयेकर यांना त्यांच्याच गोवा फॉरवर्डने (Goa Forward Party) तिकीट नाकारल्याने स्वबळावर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागलं. लोबोंमुळे पालयेकर यांच्यावर शेवटी स्वत:चे डिपॉझिटही गमावून बसण्याची पाळी आली आहे.

शिवोलीत सतत चार वेळा निवडून येण्याचा विक्रम नावावर असलेल्या माजी आमदार तथा मंत्री असलेल्या दयानंद मांद्रेकर यांना मागच्या विधानसभा निवडणुकीनंतर सलग दुसरा पराभव पत्करावा लागल्याने भाजप (BJP) सरकारमध्ये पुन्हा एकदा मंत्री बनण्याची त्यांची संधी हुकली आहे. कळंगुटमधून भरघोस मतांनी तिसऱ्यांदा विजयी होत विजयाची हॅट्रीक साधणाऱ्या मायकल लोबोनी आपल्या विरोधकांना चेकमेट केल्याचे चित्र आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT