Randeep Surjewala  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

ममतांनी काँग्रेसला समर्थन द्यावे: सुरजेवाला

देशात 60 लाख पदे रिक्त; भाजपकडून युवकांचा विश्वासघात

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात भाजपला पराभूत करण्यासाठी ममतादीदीच्या तृणमूल काँग्रेसने गोव्यात काँग्रेसच्या उमेदवारांना समर्थन द्यावे, असे मत काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांनी काल पणजीत व्यक्त केले आहे. काँग्रेसच्या कार्यालयात पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, अलका लांबा उपस्थित होत्या.(Mamata should support Congress, statment by Randeep Surjewala in goa)

गोव्याच्या मुक्तीपासून कॉंग्रेस (Goa Congress) पक्ष राज्याच्या विकासासाठी काम करत आहे. आम्हाला खात्री आहे की, गोव्यात कॉंग्रेसचेच सरकार स्थापन होईल असे म्हणत सुरजेवाला यांनी भाजपच्या (Goa BJP) केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, गोव्यासह देशभरात 60 हजार सरकारी नोकऱ्यांची पदे रिक्त आहेत. ती न भरून केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने शिक्षित युवकांचा विश्वासघात केला आहे.

महिलांची सुरक्षा या मुद्द्यावर बोलताना सुरजेवाला यांनी भाजपवर ताशेरे ओढले. ते म्हणाले, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अभियानासाठी मंजूर निधीमधील 80 टक्के निधी हा भाजपने जाहिरातींवर खर्च केला आहे. या सरकारची धोरणे महिला आणि युवाविरोधी आहेत.

‘केजरीवाल निवडणूक पर्यटक’

सुरजेवाला यांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांच्यावर टीका केली. त्यांना ‘निवडणूक पर्यटक’ असे संबोधले. ते म्हणाले, बाहेरून आलेले पक्ष गोव्याचा विकास करू शकत नाहीत. गोव्याचा विकास करण्यासाठी पर्यटन व्यवसायावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. कॉंग्रेस लोकांसाठी काम करेल आणि गोव्याला स्थिर सरकार देईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2027 आधी मुंबई इंडियन्सला धक्का? जसप्रीत बुमराहने नाकारली उपकर्णधारपदाची ऑफर; काय आहे नेमके कारण?

Gold Price: सोन्याच्या भावात मोठी घसरण; PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम की डॉलरच्या मजबुतीचा फटका?

Goa Theft: मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत 4.30 लाखांचा ऐवज लंपास; केरळमधील दाम्पत्याला अटक

Blue Flag: मांद्रे, गालगीबागला 'ब्लू फ्लॅग' मानांकन; प्रत्यक्ष ध्वजारोहणासाठी प्रतीक्षा कधी संपणार?

Sarfaraz Alam Film: ज्या शिक्षकांनी घडवले डॉक्टर, अभियंते, आयएएस; त्यांनाच स्मार्ट बोर्डच्या युगात जुळवून घेताना संघर्ष

SCROLL FOR NEXT