Aditya Thackeray Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election 2022: आदित्य ठाकरे म्हणाले... 'वाघांचा बाजार नसतो'

गोव्यात महाराष्ट्र मॉडेल राबवणार असल्याचे यावेळी महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले.

दैनिक गोमन्तक

आगामी काळात पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. यामध्ये गोवा राज्याचाही समावेश आहे. याच पाश्वभूमीवर शिवसेना नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे आज गोवा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघात प्रचारसभा घेत राज्यातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला. गोव्याचं आणि महाराष्ट्राचं एक वेगळं नातं असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितले. गोव्यात महाराष्ट्र मॉडेल राबवणार असल्याचे यावेळी महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले. (Maharashtra Environment Minister Aditya Thackeray has criticized the BJP government in Goa)

दरम्यान आदित्य ठाकरे म्हणाले, 'प्रचारासाठी आम्ही गोव्यात आलो आहोत. गोव्यातील पर्यावरणाचा विकास करण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. यापुढे जाऊन आम्ही फक्त विकास करणार नाहीत तर शाश्वत विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. भाजपने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. फक्त जिंकण आमचं काम नसून गोव्याचा विकास करणं हे आमचं ध्येय आहे. गोव्यात आम्ही जोडसाखळी खेळणार नाही.'

पुढे ते म्हणाले, ''गोव्यातील भाजप सरकारने कोरोना काळात जनतेला वाऱ्यावर सोडलं. मात्र शिवसेना गोवेकरांना प्राधान्य देणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचं मॉडेल घेऊन शिवसेना गोव्यात आली आहे. आणि आम्ही हे मॉडेल गोव्यात यशस्वी करुन दाखवणार आहोत. त्याचबरोबर गोव्यातील पर्यटन वाढविण्यासाठी आम्ही सातत्याने काम करणार आहोत. तसेच गोव्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. गोव्यात फाई स्टार हॉटेल आले, विकास झाला, मात्र सर्व सामान्य गोवेकरांच्या घरात पाणी पोहोचले नाही.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT