मगोचे उमेदवार जित आरोलकर यांच्या प्रचारात समर्थक राघोबा गावडे ,देवेंद्र प्रभुदेसाई, दयानंद मांद्रेकार ,उदय मांद्रेकार व गट अध्यक्ष प्रवीण वायगणकार व इतर Dainik Gomantak
गोवा निवडणूक

भाजपचा पराभव करण्यासाठी मगो तृणमूल हाच पर्याय;राघोबा गावडे

दैनिक गोमन्तक

मोरजी: भाजपने (BJP) चुकीच्या पद्धतीने सरकार स्थापन केल्यावर ते गप्प बसले नाही ,आता 2022 च्या निवडणुकीत (election) इतर पक्षाचे आमदार पळवून त्यांना आमदारकीच्या (MLA) राजीनामा देण्यासाठी लावून बळीचे बकरे बनवत आहे ,त्यावरून भाजपाकडे त्या त्या मतदार संघात स्वतःचे उमेदवार नसल्याने त्याची गळचेपी झाली आहे, भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी केवळ बलाढ्य उमेदवार असून चालणार नाही त्यासाठी आर्थिक बाजूही भक्कम असायला हवी ,त्यासाठी आता भाजपाला घरी पाठवण्यासाठी मगो तृणमूल युती हा पर्याय होता आणि तो आम्ही स्वीकारला आता मगोचे कार्यकर्ते मगोला विजयी करतील असा आशावाद मगोचे केंद्रीय समितीचे सदस्य राघोबा गावडे यांनी 7 रोजी आगरवाडा येथे मांद्रेचे मगोचे उमेदवार जित आरोलकर यांच्या प्रचारा दरम्यान पत्रकारांकडे बोलताना व्यक्त केला.

केंद्रीय समितीचे सदस्य राघोबा गावडे यांनी पुढे बोलताना, भाजपा मगोचा हात धरून विधानसभेत पोचला सत्येवर आला आणि त्याच पक्षाने आता पाठीत सुरा खुपसला त्या पक्षाला आता सत्येपासून दूर ठेवण्यासाठी संघटित होऊन काम करूया आणि मांद्रेमधून पर्रीवर्तन करून मगोला विजयी करण्याचे आवाहन केले.

भाजपा सोबत नाही; जित आरोलकर

मगोचे नेते जित आरोलकर यांनी बोलताना आपणास अनेक पक्षाच्या ऑफरी आहे मगो पक्षात जाण्यासाठी वर्ष लागले आणि इतर पक्षात आपण जाणारच कसा असा प्रश्न करून शेवटपर्यंत मगो पक्षात राहणार आमदार झालो तरीही भाजपात जाणार नसल्याचे ये म्हणाले ,सध्या मांद्रेत मगोला चांगले दिवस आले आहेत आमदार बदलण्यासाठी केवळ मगो पक्षाचे कार्यकर्ते मतदार इतिहास घडवू शकतात.

तृणमूल कोण कार्यकरत्ये

जित आरोलकर यांना एक प्रश्न विचारला की तृणमूल (Trinamool) किती कार्यकर्ते तुमच्यासोबत आहे त्यावर बोलताना सध्या तरी मांद्रे मतदार संघात तृणमूल काँग्रेसचे किती कार्यकरत्ये आहेत हे सांगता येणार नाही मात्र मगोचे 70 टक्के समर्थक आपल्यासोबत असल्याचे जित आरोलकर म्हणाले.

कलंकित आमदार ;उदय मांद्रेकार

भाऊ साहेब बांदोडकर यांची पुण्याई लाभलेल्या मांद्रे मतदार संघात या पूर्वीच्या कोणत्याही आमदाराने कलंक लावला नव्हता मात्र आमदार दयानंद सोपटे यांनी कलंक लावला असा दावा मगोचे गट उपाध्यक्ष उदय मांद्रेकार यांनी आरोप केला.

भाजपाचे आणि सोपटे यांचे समर्थक पत्रकार परिषद घेऊन आमदार सोपटे हे निष्कलंकीत असल्याचा दावा करतात त्यात काहीच तथ्य नसून आमदार सोपटे हे कलंकित आहेत त्यांनी मांद्रे वासीयांची नाक कापले,आमदारकी विकारणाऱ्याना आता घरी बसवण्याची ही योग्य वेळ असल्याचे उदय मांद्रेकार म्हणाले.

यावेळी पार्सेचे माजी सरपंच देवेंद्र प्रभुदेसाई यांनी मगो शिवाय पर्याय नसल्याने जित आरोलकर यांना आमदार बनवून सोपटे यांची हुकूमशाही सम्पूस्थात आणूया असे आवाहन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim News: भाडेकरूंची डिचोली पोलिस स्थानकात गर्दी! कार्यक्षेत्रात तपासणी मोहिमेला वेग

'गोवा पोलिस' अंमलीपदार्थांविरोधी गंभीर! 'कोकेन जप्ती'प्रकरणी दिल्ली पोलिसांना करणार सहकार्य

Quelossim: ही तर नौटंकी! केळशीची बदनामी केल्याचा व्हेंझी यांच्‍यावर सरपंचांचा आरोप

Sunburn Festival 2024: धार्मिक स्थळी 'असले' कार्यक्रम नकोच! 'सनबर्न' साठीच्या सभेनंतर ग्रामस्थ ठरवणार दिशा

Israel-Iran War: इस्रायल-इराण युद्धानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार! भारतासह जगभरातील देशांना बसणार फटका

SCROLL FOR NEXT