पणजी: गोव्यात आगामी गोवा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्व पक्षांचे उमेदवार आपापल्या मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. पणजी मतदारसंघात अपक्ष उत्पल पर्रीकर विरुद्ध भाजप उमेदवार बाबुश मोन्सेरात यांच्यामध्ये चुरस बघायला मिळत आहे. विवध पक्षांचे अनेक स्थानिक नेते उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देत असल्याचे चित्र समोर येत आहे. दोन्ही उमेदवारांचे समर्थक रस्त्यावर उतरून त्यांचा प्रचार करत आहेत. (Utpal Parrikar Goa Election)
भाजपने उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. परिणामी भाजपचे अनेक कार्यकर्ते पर्रीकर यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. काही स्थानिक कॉंग्रेस नेत्यांनी देखील उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा दिला आहे.
भाजपचा (BJP) हात सोडून कोंग्रेसच्या गोटात गेलेले पणजी शहराचे माजी कॉर्पोरेशन (CCP) नगरसेवक मेनिनो दा क्रूझ पणजीत काँग्रेसचे उमेदवार एल्विस गोम्स यांना सोडून उत्पल पर्रीकर यांच्यासोबत उघडपणे काम करत आहेत. मडकईकर पणजीच्या जागेसाठी इच्छुक होते. मात्र कॉंग्रेसने (Congress) त्यांना तिकीट देण्यास नकार दिला. परिणामी ते कॉंग्रेसवर नाराज आहेत. भाजप ताळगाव मंडळाचे माजी अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांनीही उत्पल यांना पाठिंबा दिला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.