Laxmikant Parsekar: गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू आहे. सर्व पक्षांतर्फे आपापल्या निवडणूक उमेदवारांच्या याद्या जाहीर होत आहेत. गोव्यातील सत्ताधारी पक्ष भाजपने (BJP) काल 40 मतदारसंघांपैकी 34 जागांसाठीची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीने गोव्याच्या राजकारणात खळबळ सुरू झाली आहे. यातच मांद्रे मतदारसंघातून (Mandre Constituency) उमेरवारीची अपेक्षा असणारे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर (Laxmikant Parsekar) यांच्याऐवजी पक्षाने दयानंद सोपटे यांना उमेदवारी जाहीर केल्याने पार्सेकर नाराज झाले आहेत.
लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आता आपली नाराजी स्पष्ट दर्शवली आहे. त्यांनी भाजप पक्षाला राजीनामा देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे त्यांनी आता मांद्रेतून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याच संधीत सहभागी होत गोवा काँग्रेस (Congress) आणि गोवा फॉरवर्ड (Goa Forward Party) पक्षातर्फे पार्सेकरांना पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरी अद्याप त्यांनी यावर कोणतेही मत व्यक्त केलेले नाही. या एकंदरीत परिस्थितीवर ते काँग्रेस नेते पी. चिदंबरम (P chidambaram) यांच्याशी चर्चा करणार आहेत.
या संदर्भात त्यांनी जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, 'मी पेडणे तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत राहणार आहे. 2017 साली पक्षाने तिकीट दिलं होतं, मात्र मी जनतेचा उमेदवार होऊ शकलो नाही. आता पक्षाने तिकीट नाकारलं आहे, पण तरीही मी जनतेचा उमेदवार म्हणून अपक्ष लढणार आहे. मला पक्षाचं तिकीट नसलं तरीही मला जनतेचे तिकीट आहे. काल मला उमेदवारी नाकारल्यानंतर कार्यकर्त्यांनी अपक्ष लढण्याचा आग्रह धरला. मला इतर पक्षांकडूनही ऑफर आहे. मात्र त्या पक्षांसोबत मी जाणार नाही. अपक्षच लढण्यावर मी ठाम आहे', असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीच्या (Goa assembly Elections 2022) तोंडावर पार्सेकरांच्या या भूमिकेमुळे भाजपला याचा फटका बसणार की यावर काहीच परिणाम होणार नाही, हे येत्या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.