Goa Election 2022 Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election 2022: डिचोली, मयेत ''गुप्त'' प्रचाराचा प्रभाव

प्रलोभनांचा वापर: पूर्वरात्री समीकरणांची फेरजुळणी

दैनिक गोमन्तक

डिचोली: निवडणुकीत आवाजी प्रचार संपून आर्थिक देवाणघेवाणीचा ''गुप्त प्रचार'' जेव्हा होतो तेव्हाच खऱ्या अर्थाने कोणत्या उमेदवाराचे पारडे जड आहे, हे स्पष्ट होते. डिचोली तालक्यातील डिचोली, मये व साखळी या तिन्ही मतदारसंघात या गुप्त प्रचाराने शेवटच्या दोन दिवसांत उमेदवारांनी समीकरणांची फेरजुळणी केल्याचे समजते.

डिचोलीत तिरंगी लढतीबाबत उत्सुकता

डिचोली मतदारसंघात लढत तिहेरी आहे. भाजपचे राजेश पाटणेकर, मगोपचे नरेश सावळ व अपक्ष उमेदवार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्यातील तुल्यबळ लढाईत कॉंग्रेस व अन्य पक्ष काही पारंपरिक मते तेवढी खेचतील, असा जो अंदाज आधीपासूनच होता, त्याला शेवटच्या टप्प्यात बळकटी मिळाली. डॉ. शेट्ये यांचे आवाजी प्रचारावर निर्विवाद वर्चस्व होते. त्यांनी आपण सतत चर्चेच्या केंद्रस्थानी राहू, याची खबरदारी घेतली.

डिचोलीत सायंकाळी पाच वाजेपर्यंत 84 टक्क्यांचा पल्ला मतदानाने गाठला होता. हा प्रस्थापितविरोधी कौल असल्याचा अभिप्राय भाजप विरोधी गटांतून व्यक्त होत होता.

मयेत सायंकाळी पाच वाजेपर्यंत 80 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला होता. भाजपचे प्रेमेंद्र शेट, गोवा फॉरवर्डचे संतोष सावंत, मगोपचे प्रवीण झांट्ये,आपचे राजेश कळंगुटकर, अपक्ष उमेदवार मिलिंद कळंगुटकर तसेच आरजीचे श्रीकृष्ण परब कार्यकर्त्यांशी चर्चा करताना आढळले. मद्याचे चोरून वितरण झाल्याचा पुरावाही मिळाला. या मतदारसंघात विजेत्यांचे मताधिक्यही बरेच कमी असेल, याचा अंदाज सर्वत्र येत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT