Congress and BJP  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

अपक्षांना येणार ‘सोन्याचे दिवस’

संपर्क अभियान सुरू: भाजप-कॉंग्रेसची सत्ता स्थापनेसाठी चढाओढ

दैनिक गोमन्तक

पणजी: भाजप आणि विरोधी काँग्रेसने सत्तेत येण्याचे दावे ठोकले असले, तरी दोन्ही पक्षांना बहुमत मिळणार नाही, असा अंदाज विविध माध्यमांच्या सर्वेक्षणावरून समोर आला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या संभाव्य विजयी उमेदवारांवर लक्ष केंद्रित केले आहे.

यावेळच्या निवडणुकीमध्ये अपक्ष आमदार कमी प्रमाणात निवडून येतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, सध्याची स्थिती उलटी आहे. राज्यात सात अपक्ष निवडून येतील असे अनुमान राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. त्यात प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, उत्पल पर्रीकर, आंतोन वाझ, आलेक्स रेजिनाल्ड, सावित्री कवळेकर आणि डॉ. चंद्रकांत शेट्ये या नावांचा समावेश असून इजिदोर फर्नांडिस आणि विल्फ्रेड डिसा यांची नाव चर्चेत आहेत.

...तर मगोप ‘किंगमेकर’

मगोप २०१७ च्या निवडणुकीप्रमाणेच यंदाही चांगली कामगिरी करील अशी अपेक्षा आहे. या निवडणुकीत मगोपने तृणमूल काँग्रेसबरोबर युती करत १३ जागा लढवल्या. त्यापैकी ६ जागांवर त्यांनी विजयाचा दावा केला असून तृणमूलही काही जागा जिंकेल, असा अंदाज असून सत्ता स्थापनेत मगोप किंगमेकरची भूमिका बजावू शकतो. याशिवाय तृणमूल, राष्ट्रवादी आणि ‘आप’चे काही आमदार निवडून येण्याची शक्यता निर्माण झाली असून या पक्षांशीही काही नेते संपर्कात राहून पुढील मोर्चेबांधणी करत आहेत.

‘मॅजिक फिगर’साठी अपक्षांचा आधार

यावेळी सात पेक्षा जास्त अपक्षांनी आपणही निवडून येऊ शकतो, इतका भक्कम जनाधार मिळवला आहे. काँग्रेस आणि भाजपला सत्तेसाठीची ‘मॅजिक फिगर’ मिळवता आली नाही, तर इतरांची मदत घ्यावी लागणार आहे. यात प्रामुख्याने या अपक्षांचा समावेश असणार आहे. यावेळेला इतर राजकीय पक्षांबरोबर सहापेक्षा जास्त अपक्ष उमेदवार निवडून येतील असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे सुरवातीपासूनच या अपक्षांशी भाजप आणि काँग्रेसने संपर्क सुरू ठेवल्याची माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठ्या घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

SCROLL FOR NEXT