Chandrakant Babu Kavlekar Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election: बाबू एल्टनच्या कार्यकर्त्यांत जुंपली

मतदानास केवळ दोन दिवस बाकी असताना केपेत ताणतणाव वाढत असून उपमुख्यमंत्री कवळेकर यांच्यावर हात घालण्याचा प्रयत्न

दैनिक गोमन्तक

केपे: मतदानास केवळ दोन दिवस बाकी असताना केपेत ताणतणाव वाढत असून शनिवारी रात्री उपमुख्यमंत्री कवळेकर यांच्यावर हात घालण्याचा प्रयत्न झाल्याने स्थिती काही काळ हाताबाहेर गेली. केपे बाजारात उपजिल्हाधिकारी कार्यालया समोरच ही घटना घडली. त्यामुळे बाजारात मोठा जमाव निर्माण झाला. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्याना वेगळे केले.

केपे संवेदनशील भाग : काही दिवसांत कवळेकर आणि डिकॉस्टा यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सतत वाद होत होते. याच परिस्थितीत आज बाबू कवळेकर रात्रीच्यावेळी आपल्या एका कार्यकर्त्यांच्या स्कूटरवरून फिरत असल्याने ते पैसे वाटायला फिरतात असा संशय व्यक्त करून डिकॉस्टा यांच्या कार्यकर्त्यानी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला.

यावेळी कवळेकर यांचे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याने त्यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी डिकॉस्ता यांच्या एका कार्यकर्त्याने कवळेकर यांना ढकलण्याचा प्रयत्न केला. शेवटी पोलिसांना पाचारण करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT