Goa ZP election results 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीच्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. संध्याकाळी 4:22 वाजेपर्यंत हाती आलेल्या कलानुसार, सत्ताधारी भाजपने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासह 50 पैकी 22 जागा जिंकून मोठी आघाडी घेतली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ग्रामीण भागात आपला प्रभाव कायम राखला असून, उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही जिल्हा पंचायतींमध्ये 'कमळ' फुलताना दिसतेय. भाजपने केरी, कारापूर-सर्वण, रिवोणा आणि ताळगाव यांसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये विजय मिळवत विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले.
काँग्रेस आणि अपक्षांची कामगिरी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळालेले नाही. आतापर्यंत काँग्रेसने केवळ 7 जागांवर विजय मिळवलाय. प्रामुख्याने साष्टी तालुक्यातील नुवे आणि कुडतरी यांसारख्या बालेकिल्ल्यांमध्ये काँग्रेसने आपले अस्तित्व टिकवून ठेवलेय. दुसरीकडे, अपक्ष उमेदवारांनी अनेक ठिकाणी प्रस्थापित पक्षांना धक्का दिला असून 4 जागांवर विजय मिळवलाय. यामध्ये कोलवाळेतून कविता कांदोळकर आणि कुठ्ठाळीतून मर्सियाना वास यांचा विजय लक्षवेधी ठरला.
इतर पक्षांची स्थिती आणि 'आप'चा ससेमिरा स्थानिक राजकारणात सक्रिय असलेल्या इतर पक्षांनाही या निवडणुकीत मर्यादित यश मिळाले. रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टी, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि मोठ्या उत्साहाने रिंगणात उतरलेल्या आम आदमी पार्टीने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे.
प्रमुख विजयी उमेदवारांचा तपशील भाजपच्या विजयी उमेदवारांमध्ये निलेश परवार (केरी), महेश सावंत (कारापूर), राजश्री राजेश गावकर (रिवोणा), अमित अस्नोडकर (सुकुर), आणि रघुवीर कुंकळ्येकर (ताळगाव) यांचा समावेश आहे. काँग्रेसकडून अँथनी ब्रागांझा (नुवे) आणि अस्त्रा रॅन्झिल दा सिल्वा (कुडतरी) विजयी झाले आहेत. तसेच, बेतकी-खांडोळा येथून सुनील जाल्मी यांनी अपक्ष म्हणून बाजी मारली आहे. एकूणच हे निकाल 2027च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला उभारी देणारे ठरतायत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.