पणजी: सांताक्रुझच्या माजी आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस या एक लढवय्या होत्या. आता त्यांचे पुत्र काँग्रेतसर्फे निवडणुकीत उभे आहेत. ते सुद्धा तुमची कामे करण्यासाठी आईप्रमाणेच लढा देतील. त्यांच्या आईने ज्या मतदारांना आश्वासने दिली होती ती त्यांचे पुत्र पूर्ण करतील. त्यामुळे सांताक्रुझवासीयांनी रुदॉल्फ फर्नांडिस यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून देण्याचे आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) वाद्रा यांनी सांताक्रुझ येथील जाहीर सभेत केले. (Goa State ranks second in unemployment in india says Priyanka Gandhi)
यावेळी भाजप सरकारवर (Goa Government) जोरदार टीका करताना गांधी म्हणाल्या की, भाजपचे लक्ष फक्त कोणत्याही प्रकारे सत्ता मिळवणे असून राज्याचा विकास हे फक्त लोकांची फसवणूक करण्यासाठी आहे. गोव्याची संस्कृती, पर्यावरण तसेच ओळख टिकवण्यासाठी लोकांनी काँग्रेसला (Goa Congress) पर्याय म्हणून यावेळी मतदान करावे. गोव्यात कोणत्याच प्रकारचे पर्यावरण विध्वसंक प्रकल्प लोकांवर लादले जाणार नाहीत. जे लोकांना हवे आहे त्याप्रमाणेच विकास केला जाईल. गोव्यातील लोकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करण्यात आले व केंद्राच्या निर्देशानुसार राज्यातील भाजप सरकार प्रकल्प लोकांवर लादत राहिले. हे सरकार स्थिर नव्हते तर इतर पक्षातील आमदारांना फोडून सरकार स्थिर ठेवण्याचा केलेला प्रयत्न होता. लोकांनी त्यांना बहुमत दिले नव्हते तरी सत्तेची हाव असलेल्या भाजपने सरकार स्थापन केले. मात्र, यावेळी लोकांनी त्यांना योग्य तो धडा शिकवण्यासाठी काँग्रेसला बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन सभेतकेले.
एकजुटीने कॉंग्रेसला बहुमत द्या
निवडणूक तोंडावर आल्यानंतर मते मिळवण्यासाठी भाजप सरकारने नोकरभरती सुरू केली व मते मिळवण्याचा प्रयत्न केला असला तरी लोक त्यांची क्लृप्ती जाणून आहेत. त्यामुळेच पुढील सरकार काँग्रेसचे राज्यात यावे यासाठी लोकांनी एकजुटीने काँग्रेसला बहुमत देण्याचे आवाहन प्रियांका गांधी यांनी केले.
न्यायासाठी लढणाऱ्यांवर भाजपकडून अत्याचार
राज्यातील भाजप सरकारने लादलेल्या प्रकल्पांना विरोध करताना लोकांवर अत्याचार केला. न्यायासाठी लढणाऱ्या गोमंतकियांवर कायदा व सुव्यवस्थेचा गैरवापर करण्यात आला. हे सरकार महिलांना संरक्षण देणारे नाही तर महिलांवरील अत्याचारामध्ये गुंतलेल्यांना संरक्षण देणारे आहे. देशात गोवा हे बेरोजगारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे यावरून या सरकारने किती प्रमाणात लोकांना नोकऱ्या दिल्या हे दिसून येत आहे, असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.