आगरवाड्यात जिलेटीनचा स्फोट: संबंधितांवर कारवाईची मागणी

येथील डोंगरावर खडक फोडण्यासाठी जिलेटीनचा वापर करण्यात येत असून त्यामुळे हे बॉम्बसदृश्य स्फोट घडवून आणले जात असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे
Explosion of gelatin in Agarwada
Explosion of gelatin in AgarwadaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मोरजी: आगरवाडा - मांद्रे दरम्यान बोडको धेनु डोंगरावर सोमवार सायंकाळी 4.30 च्या दरम्यान कानठळ्या बसवणारा स्फोट झाल्याने आगरवाडा गावातील लोकांची एकच धावपळ उडाली. येथील डोंगरावर खडक फोडण्यासाठी जिलेटीनचा वापर करण्यात येत असून त्यामुळे हे बॉम्बसदृश्य स्फोट घडवून आणले जात असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे बेकायदेशीरपणे जिलेटीन स्फोट (Gelatin blast) घडवून आणणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक लोकांकडून करण्यात येत आहे. (Explosion of gelatin in Agarwada)

Explosion of gelatin in Agarwada
एसीजीएल कंपनीच्या स्टोअर विभागाला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता

याबाबत आगरवाडा (Agarwada) - चोपडेचे सरपंच भगिरथ गावकर यांना विचारले असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. आपल्यालाही सोमवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास डोंगर माथ्यावर स्फोट झाल्याचा आवाज आला. मात्र, तो स्फोट (Explosion) नक्की कसला हे कळू शकले नाही. आगरवाडा डोंगर माथ्यावर खडक फोडण्यासाठी जिलेटीनचा वापर होत असल्याच्या तक्रारी आहेत. पंचायतीतर्फे याची शहानिशा करून कारवाई करण्यात येईल. लोकांनी याबाबत पंचायतीला सहकार्य करावे, असेही ते म्हणाले.

निवडणूक (Goa Assembly Election) रणधुमाळीत अशाप्रकारे गैरफायदा घेवून दिवसाढवळ्या जिलेटीन स्फोट होत असल्याबद्दल नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. असे प्रकार बंद न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेण्याचे स्थानिक नागरिकांनी ठरवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com