Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election 2022: साखळीत मुख्यमंत्र्यांची कसोटी?

दैनिक गोमन्तक

साखळी: साखळी हा मतदारसंघही सध्या प्रतिष्ठेचा बनला आहे. याचे कारण म्हणजे या मतदारसंघातून विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे निवडणूक लढवित आहेत. डॉ. प्रमोद सावंताची निवडणूक लढविण्याची ही तिसरी खेप असून दोन वेळा ते जिंकले तर एकावेळी ते हरले आहेत. सुरुवातीला 2008 साली झालेल्या पोटनिवडणूकीत डॉ.सावंताचा कॉग्रेसच्या प्रताप गावसांकडून पराभव झाला होता. पण 2012 व 2017 साली त्यांनी विजय प्राप्त करून विधानसभेत प्रवेश केला.

त्यावेळची साखळीची निवडणूक आतासारखी महत्त्वाची वाटत नव्हती. याचे कारण म्हणजे त्यावेळी डॉ. सावंत हे मुख्यमंत्री नव्हते. पण आता ते मुख्यमंत्री असल्यामुळे व 2017 साली तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा मांद्रेतून पराभव झाल्यामुळे सगळ्यांचे लक्ष साखळीवर लागले आहे. सुरुवातीला डॉ. सावंत यांचा सहजपणे विजय होईल असेचित्र होते. पण गेल्या काही दिवसात हे चित्र बदलताना दिसत आहे. मागे साखळी नगरपालिका कक्षेत कॉग्रेसचे वर्चस्व तर पंचायतीत भाजपचे वर्चस्व अशी स्थिती होती.

आताही साखळी नगरपालिका कक्षेत कॉग्रेसचे वर्चस्व असून पंचायतीतील परिस्थिती बदलताना दिसत आहे. कॉग्रेसने आता ग्रामीण भागात सुध्दा जबरदस्त मुंसडी मारल्याचे प्रत्ययाला येत असून त्यामुळेच मुख्यमंत्र्याची कसोटी लागणार आहे. सध्या राजकीय विश्लेषकांच्या मते मुख्यमंत्र्यांना 50-50 संधी आहे.

भाजपातले अनेक छुपे रुस्तम मुख्यमंत्र्यांना ‘अपशकून’ करण्याच्या तयारीला लागले आहेत. भाजपसत्तेवर आल्यास मुख्यमंत्री परत डॉ. सावंत असे श्रेष्ठींनी सांगितल्यामुळे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले काही ज्येष्ठ भाजप नेते मुख्यमंत्र्यांना साखळीतच गारद करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

पण त्याचबरोबर मुख्यमंत्र्याच्या विरोधात फक्त कॉग्रेसच नसून महादेव खांडेकर (मगो), मनोजकुमार घाडी (आप), सागर धारगळकर (शिवसेना), संजय गावस(रिव्होल्युशनरी गोवन्स), नवनाथ मुळवी (जय महाभारत) व धडकन पठाण, महेश परब, सुनिल फळारी, सुनिल सातोडकर हे अपक्ष असे आणखी नऊ उमेदवार रिंगणात आहेत.

या सगळ्यांच्या मतांचे विभाजन होऊन मुख्यमंत्र्यांना परत संधी मिळू शकते असा होरा व्यक्त होत आहे.

तरी सध्या सगलानी यांनी मुख्यमंत्र्यासमोर अतिशय कठीण असे आव्हान उभे केले आहे. ग्रामीण भागाचा आढावा घेतल्यास मुख्यमंत्र्यांना परिस्थिती म्हणावी तेवढी अनुकुल नाही. हे दिसून येते. अर्थात मुख्यमंत्री आपल्या परीने प्रयत्न करत असून मतदारांशी संपर्क साधताना दिसत आहेत. पण या लढाईवर सगळ्या गोमंतकीयाचे लक्ष असून अनेकांनी सगलानी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. कसेही करून मुख्यमंत्र्यांचा पराभव करायचाच असे ध्येय बाळगून बरेचजण वावरताना दिसताहेत.

काही तर कोरोना काळच्या आठवणी ताज्या करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे शेजारच्या वाळपई व पर्ये या मतदारसंघात भाजपच्या दृष्टीने सर्व काही ‘आलबेल’ असल्याचे सूचित होत असताना साखळीत मात्र मुख्यमंत्र्यांना युध्द पातळीवर लढावे लागत आहे. या निवडणूकीत लक्षात आलेली एक प्रमुख गोष्ट म्हणजे मतदारांची केलेली उपेक्षा ही निवडणूकीच्या काळात उमेदवारासमोर दत्त म्हणून उभी राहत असते. याकरिता पाचही वर्षे मतदारांच्या संपर्कात राहणे महत्त्वाचे असते. विश्वजीत राणे, सुदिन ढवळीकर, दिगंबर कामत यांनी ज्या रीतीने आपले मतदारसंघ सांभाळले आहेत.

ती इतर आमदारांना एक मोठी शिकवण आहे. मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असल्यामुळे त्यांचे मतदारसंघाकडे थोडेफार दुर्लक्ष होणे साहजिकच असते. पण हेच दुर्लक्ष गेल्या खेपेला माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांना महागात पडले होते हे विसता येत नाही. आता ‘आरोपीच्या पिंजऱ्यात’ मुख्यमंत्री सावंत आहेत. आता ते या पिंजऱ्यातून कसे बाहेर पडतात, आपल्या बुध्दिचातुर्याचा उपयोग करून या आणीबाणीच्यास्थितीतून कसे निसटतात, कॉग्रेस 2008 सालाच्या पोटनिवडणूकीत मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती करते की काय या सर्वांची उत्तरे निकालानंतरच मिळणार हे निश्चित.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT