Vishwajit Rane Dr. Divya Rane and Jennifer Monserrat Babush Monserrat Dainik Gomantak
गोवा निवडणूक

BJPकडून घराणेशाहीचे समर्थन; राणे-मोन्सेरात दाम्पत्य गोवा निवडणूकीच्या मैदानात

या यादीत भाजपची वन फॅमिली वन तिकीट ही घोषणा हवेतच विरल्याचे पाहायला मिळाले. कारण याच यादीत भाजपने राणे दाम्पत्य आणि मोन्सेरात दाम्पत्याला तिकीट जाहीर केले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Elecion 2022) भाजपने आज 34 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केला. भाजपची ही यादी कालच जाहीर करण्याचे ठरले होते मात्र काही जागांवर कालपर्यंत विचारविनमय सुरू असल्याने ही यादी येण्यास वेळ लागला. अखेरीस आज भाजपने (BJP) गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत आपल्या 34 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. यात राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर, चंद्रकांत कवळेकर यांच्यासह इतर नावांचा समावेश आहे.

मात्र या यादीत भाजपची वन फॅमिली वन तिकीट ही घोषणा हवेतच विरल्याचे पाहायला मिळाले. कारण याच यादीत भाजपने राणे दाम्पत्य आणि मोन्सेरात दाम्पत्याला तिकीट जाहीर केले आहे. यादिमध्ये प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार भाजपने वाळपई मतदारसंघातून विश्वजीत प्रतापसिंग राणे (Vishwajit Rane) आणि पर्ये मतदारसंघातून त्यांची पत्नी दिव्या विश्वजीत राणे (Dr. Divya Rane) यांना तिकीट जाहीर झाले आहे. त्याचसोबतच पर्रिकरांचा बालेकिल्ला असलेल्या पणजी मतदारसंघातून बाबूश मोन्सेरात (Babush Monserrat) आणि ताळगाव मतदारसंघामधून त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात (Jennifer Monserrat) यांना भाजपने उमेदवारी घोषित केली आहे.

भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील या घराणेशाहीचे समर्थन केले आणि या यादीत दिलेली उमेदवारी योग्यच असल्याचे सांगितले. "विश्वजीत राणे हे भाजपचे आमदार होते. त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा देवून वाळपई मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत विजय मिळवला होता. तर पर्ये हा मतदारसंघ काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रतापसिंग राणे यांचा होता. आम्ही त्यांना काँग्रेसच्या उतरता आलेख बघता भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. परंतु प्रतापसिंग राणे यांनी आता वय झाले म्हणत सक्रिय राजकारणापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या जागी त्यांनी हा मतदारसंघ भाजपला दिला असून त्याठिकाणी भाजपने राणे यांच्या इच्छेनुसारच प्रतापसिंग राणे यांची सुन डॉ. दिव्या राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर मोन्सेरात दाम्पत्य यापुर्वी पासूनच विधानसभेवर होते. त्यामुळे जेनिफर मोन्सेरात आणि बाबूश मोन्सेरात यांना त्यांच्या सिटींग जागेवरूनच उमेदवारी देण्यात आली असल्याचे," देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

SCROLL FOR NEXT