MLA Alina Saldhana  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

कुठ्ठाळी विधानसभेत होते काँग्रेसचे वर्चस्व, यावेळी होणार तिरंगी लढत

कुठ्ठाळी ही जागा दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघामध्ये येते. 2017 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान, या जागेवर एकूण 30,463 मतदार होते.

दैनिक गोमन्तक

Goa Assembly Election 2022: 2017 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (BJP) तिकीटावर कुठ्ठाळी विधानसभा मतदारसंघातून (Cortalim Legislative Assembly Seat) अलिना साल्डाना (Alina Saldanha) या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या, त्या आता आम आदमी पार्टीमध्ये सामील झाल्या आहेत. डिसेंबर 2021 मध्ये एलिना यांनी भाजपच्या आमदार पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपमध्ये प्रवेश केल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. एलिना कुठ्ठाळी मतदारसंघातून दोनदा आमदार झाल्या आहेत, त्यामुळे या जागेवर रंजक लढत पाहायला मिळणार आहे.

2012 आणि 2017ची निवडणूक माहिती

2017 च्या विधानसभा निवडणुकीत, अलिना साल्डाना यांनी अपक्ष उमेदवार अँटोनियो वास (Antonio Vas) यांचा 518 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत अलिना यांना एकूण 5,666 मते मिळाली. तर अँटोनियो वास यांना 5,148 मते मिळाली होती. काँग्रेसचे उमेदवार गिल्बर्ट मारिनो यांना 4,326 मते मिळाली आणि ते तिसरे आले. तर आपच्या उमेदवाराला 2,482 मते मिळाली होती.

2012 च्या निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर भाजपचे उमेदवार जोस साल्डाना (Jose Matanhy Saldanha) यांनी गोवा विकास पक्षाच्या उमेदवार नेली रॉड्रिग्सचा 2,269 मतांनी पराभव केला. जोस साल्डाना निवडणुकीनंतर काही दिवसांनी मरण पावले, म्हणून 2012 च्या उत्तरार्धात कुठ्ठाळी जागेवर पोटनिवडणूक झाली. पोटनिवडणुकीत भाजपने जोस साल्डाना यांच्या पत्नी अलिना साल्डाना यांना तिकीट दिले आणि त्या विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या.

कुठ्ठाळी विधानसभा मतदारसंघातील मतदार

कुठ्ठाळी ही जागा दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघामध्ये येते. 2017 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान, कुठ्ठाळी जागेवर एकूण 30,463 मतदार होते. यामध्ये एकूण वैध मतांची संख्या 23,486 होती. सध्या येथे एकूण 30,153 मतदार असून त्यात पुरुष मतदारांची संख्या 14,900 आणि महिलांची संख्या 15,253 आहे.

कुठ्ठाळी विधानसभा क्षेत्राचा इतिहास

1963, 1967 आणि 1972 च्या निवडणुकीत युनायटेड गोअन्स पार्टीचे बार्बोसा लुईस पोलेक्सो विजयी झाले. यानंतर 1977 ते 1999 पर्यंत कुठ्ठाळी जागेवर काँग्रेसची सत्ता होती. 2002 च्या विधानसभा निवडणुकीत युनायटेड गोअन्स डेमोक्रॅटिक पक्षाने ही जागा जिंकली होती. 2007 च्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसने पुनरागमन केले आणि विजय मिळवला. 2012 मध्ये कुठ्ठाळी विधानसभा जागेवर भाजपने प्रथमच विजयाची चव चाखली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT