Congress  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Assembly Election 2022: सासष्टीमध्ये काँग्रेससाठी सत्तेचे दार उघडणार का?

चार मतदारसंघात दोलायमान स्थिती

दैनिक गोमन्तक

मडगाव: ज्याच्या हाती सासष्टी त्याची गोव्यावर सत्ता असे समीकरण असल्याने गोव्याच्या राजकारणात या तालुक्याला अनन्य साधारण महत्व आहे. या तालुक्यातील आठही मतदारसंघ तसे पाहिल्यास काँग्रेस धार्जिणे. मात्र, यावेळी यातील चार मतदारसंघ असे आहेत जिथे काहीही घडू शकते आणि नेमकी तीच चिंता काँग्रेसला (Congress) सतावणारी आहे.

यावेळी काँग्रेस आणि गोवा (goa) फॉरवर्ड या पक्षात युती असून मडगाव, फातोर्डा, नुवे आणि काही प्रमाणात कुंकळ्ळी हे चार मतदारसंघ सोडल्यास बाणावली, कुडतरी, नावेली आणि वेळ्ळी या चार मतदारसंघात काहीही होऊ शकते अशी स्थिती आहे.

मडगाव आणि फातोर्डा येथे दिगंबर कामत (digambar kamat) आणि विजय सरदेसाई हे बाजी मारणार अशी शक्यता असून नुवेतून आलेक्स सिक्वेरा पुन्हा कमबॅक करतील अशी अपेक्षा आहे. कुंकळ्ळीतील बहुरंगी लढतीत भाजपचे क्लाफास डायस यांनी काँग्रेसचे युरी आलेमाव यांच्यासमोर आव्हान उभे केले असले, तरी आलेमाव ते परतवून लावतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, बाणावली, नावेली, वेळ्ळी आणि कुडतरी या चार मतदारसंघात काँग्रेससाठी 50 - 50 च संधी आहे. कुडतरीत काँग्रेसचे मोरेन रिबेलो यांना आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्स यांच्या आव्हानाला तोंड द्यावे लागत आहे.

नावेलीत आपच्या प्रतिमा कुतिन्हो व तृणमूलच्या वालंका आलेमाव यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे आवेर्तान फुर्तादो हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले जाण्याची शक्यता आहे. वेळ्ळी हा पूर्णतः काँग्रेस धार्जिणा पक्ष असला तरी काँग्रेसचे सावियो डिसिल्वा व तृणमूलचे बेंजामिन सिल्वा यांच्यातील लढत भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले फिलिप नेरी रोड्रिग्ज यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा आणि सिंधुदुर्ग संबंध अधिक दृढ होणार, तवडकरांनी घेतली नारायण राणेंची भेट; विकासावर केली चर्चा!

"घे रे पातोळ्यो खाया सगळेजाण" मुख्यमंत्र्यांना 'खाऊचा डब्बा' देणाऱ्या चिमुकलीचा Video Viral

IND vs ENG: विकेट मिळाली, पण एक चूक झाली! प्रसिद्ध कृष्णाचा विकेटचा आनंद क्षणातच मावळला; काय झालं नेमकं? पाहा व्हिडिओ

Goa Politics: विरोधकांचे मुद्दे खोडता येतनसल्याने सत्ताधाऱ्यांचा धुडगूस; कार्लुस फेरेरा

Lucky Zodiac Signs: 4 ऑगस्टचा सोमवार खास! 5 भाग्यवान राशींचे नशिब उजळणार; होणार लक्ष्मीचा कृपावर्षाव

SCROLL FOR NEXT