डिचोली: भाजप सरकारने (BJP) प्रत्येक क्षेत्रात लोकांची लूट चालवली आहे. सरकारी नोकऱ्या विकल्या जात आहेत. नोकऱ्या हव्या असेल तर युवकांना त्यांच्या उमेदवारांच्या प्रचाराला फिरण्याची जबरदस्ती केली जात आहे. भारतीय जनता पक्षाकडे राज्य चालवण्यासाठी व्यवस्थापनच नसल्याने राज्यातील आर्थिक स्थिती कोलमडली आहे. कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. त्यासाठी कर्ज घेतले जाते, अशी टीका गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी करून, भ्रष्ट भाजपला घरी पाठवण्यासाठी गोवा फॉरवर्डने काँग्रेस (congress) सोबत युती केली आहे. असे स्पष्ट केले.
शनिवारी मये येथे झालेल्या फॉरवर्डच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी पक्षाचे स्थानिक नेते संतोषकुमार सावंत, पक्षाच्या पर्यावरण विभागाचे निमंत्रक विकास भगत आणि अन्य नेते उपस्थित होते. राज्याला सावरण्यासाठी मतदारांनी यावेळी गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेस पक्षाचे युती सरकार बनवण्याची संधी द्यावी, असे आवाहनही सरदेसाई यांनी केले.
भाजप वैफल्यग्रस्त झालेला आहे. या निवडणुकीत (election) आपण हरणार या भीतीने मते विभागण्यासाठी त्यांनी आम आदमी पक्ष आणि टीएमसीला गोव्यात बोलावले आहे. मात्र त्यांचा हा अजेंडा यशस्वी होणार नाही, असेही सरदेसाई म्हणाले. मये मतदारसंघ विकासापासून वंचित आहे. काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डचे सरकार आल्यावर मये मतदारसंघातील विकासकामे केली जाईल, असे आश्वासनही विजय सरदेसाई यांनी देऊन फॉरवर्डचे नेते संतोषकुमार सावंत यांना मतदारसंघात भक्कम पाठींबा असल्याचे म्हटले आहे.
संतोषकुमार सावंत यांनी भाजपावर टिकास्त्र सोडले. या मतदारसंघाचा काहीच विकास झाला नसल्याचे ते म्हणाले. आता या मतदारसंघात परिवर्तनाची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगून जमनी आणि इतर प्रश्न आहेत ते सोडवू, अशी ग्वाही दिली.
...तर भाजपने हिंमत दाखवावी
विकास भगत यांनी विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली आणि त्यांनी विधानसभेत लोकांच्या प्रश्नाला वाचा कशी फोडली त्याची उदाहरणे दिली. विजय सरदेसाई गोव्यासाठी चांगले काम करत असल्याने, त्यांना त्रास देण्यासाठी फॉर्मेलिनचा विषय काढण्यात येतो. भाजप सरकारला हिंमत असेल तर त्यांनी फॉर्मेलिन प्रकरणी कारवाई करावी, असेही ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.